संजय खोटलेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय खोटलेकर यांना 
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
संजय खोटलेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

संजय खोटलेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

sakal_logo
By

03350
लंडन ः संजय खोटलेकर यांना गौरविताना बॅ. संवेदन अपरांती.

संजय खोटलेकर यांना
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
कुडाळ, ता. १७ ः सोनवणे फाउंडेशन व रेडियंट अॅकॅडमीतर्फे लंडन येथे बुद्धभिम महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात सहभागी अनुयायांना बॅ. संवेदन अपरांती यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये ओरोस येथील पंचशिल ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खोटलेकर यांनी गेली २५ वर्षे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या निःस्वार्थी कामाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या ''एक तळमळ'' या आत्मचरित्र पुस्तका डॉ. बाबासाहेब यांच्या राहत्या घरी असलेल्या वाचनालयात इतर वाचकांसाठी ठेवण्याचा मान मिळाला. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
..............
‘रमाई नदी गाळमुक्त करा’
मालवण : तालुक्यातील रमाई नदीपात्रातील मसुरे-देऊळवाडा हा भाग गाळाने भरला आहे. स्थानिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने नद्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून नदीकिनारच्या शेती-बागायतीमध्ये पाणी घुसून जमीन क्षारयुक्त होण्याचा धोका आहे. शासकीय यंत्रणेमार्फत अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मसुरे देऊळवाडा परिसरातील गाळ उपसा त्वरित सुरू करून रमाई नदी गाळमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी पत्राद्वारे माजी खासदार नीलेश राणे यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या जलसंधारण अधिकाऱ्यांकडे केली आहे.