पुण्यातील विद्यार्थ्यांकडून मालवण किनारी स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील विद्यार्थ्यांकडून 
मालवण किनारी स्वच्छता
पुण्यातील विद्यार्थ्यांकडून मालवण किनारी स्वच्छता

पुण्यातील विद्यार्थ्यांकडून मालवण किनारी स्वच्छता

sakal_logo
By

03358
मालवण : प्लास्टिक बाटल्या व कचरा एकत्रीकरण करताना कटारिया महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग.

पुण्यातील विद्यार्थ्यांकडून
मालवण किनारी स्वच्छता
ओरोस, ता. १७ ः किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंड (जि. पुणे) यांची जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बीच व तारकर्ली बीच येथे नुकतीच शैक्षणिक सहल झाली. यावेळी सहलीतील विद्यार्थी आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. किनारी परिसरातील प्लास्टिक बाटल्या व कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी पर्यावरणपूरक प्लास्टिक संकलन व वृक्ष संवर्धन करण्यात आले. यावेळी साधारण सुमारे ८०० प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यात आल्या. भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे एफ.वाय., एस.वाय., बी.एससी, बी.कॉम व टी.वाय. बीएससीच्या २६ मुली व २३ मुले असे एकूण ४९ विद्यार्थी सहभागी झाले. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुभाष समुद्र, श्रीकृष्ण ननवरे यांच्या नियोजनानुसार या उपक्रमात प्रा. डॉ. शरद जगताप, प्रा. जितेंद्र देशमुख, प्रा. सीमा ननवरे, प्रा. नीलेश कुतवळ, प्रा. श्रीराज जाधव सहभागी झाले. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अध्यक्ष प्रकाश कानूरकर यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.