परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर फोडला

परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर फोडला

rat१७p१७.jpg
०३३३७
चिपळूणः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील कठीण कातळ फोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

परशुराम घाटातील कातळ अखेर फोडला
काँक्रिटीकरणातील अडथळा दूरः पाईपलाईनचे कामही मार्गी
चिपळूण, ता. १७ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामात अडथळा निर्माण करणारा व घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा बहुतांशी भाग फोडण्यात यश आले आहे. शिवाय एका बाजूच्या काँक्रिटीकरणाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वी दोन्ही लेनचे काम पूर्ण होणार, हे आता निश्चित झाले आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण झाले आहे.
गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते; मात्र आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पूर्ण झाले असून, त्यांच्या हद्दीतील केवळ २७० मिटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्यासाठी हे काम रखडले होते; मात्र आता पाईपलाईनचे कामही पूर्ण झाले आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता.
आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भरावाचे काम पूर्ण केले. त्यानंतर आता काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील ३ दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com