स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी सुमारे 10 कोटी निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी सुमारे 10 कोटी निधी
स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी सुमारे 10 कोटी निधी

स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी सुमारे 10 कोटी निधी

sakal_logo
By

rat१७८.txt
८ (टूडे १ साठी)

- rat१७p१५.jpg ः
२३M०३३३५
खेड ः स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड.

- rat१७p१६.jpg ः
२३M०३३३६
ठाकरे नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असतानाची परिस्थिती.

मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी १० कोटी

आमदार योगेश कदम ः स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

खेड, ता. १७ ः खेडच्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राला राज्य सरकारने सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटदेखील पूर्ण झाले असून निधीची तरतूद झाल्याने आता या सांस्कृतिक केंद्राला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कलाप्रेमी व्यक्त करत आहेत.
दुरुस्तीच्या नावाखाली गेली १२ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. आमदार कदम यांनी या सांस्कृतिक केंद्रासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. या मागणीला गेल्या वर्षभरात सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारकडून मिळाला असून, सुमारे१० कोटी निधीची तरतूद केली आहे. खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र २००१ ला उभे राहिले. मराठी रंगभुमीवरील अनेक दर्जेदार नाटकांनी सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली. तालुक्यातील नवोदित कलाकारांनाही आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपिठ मिळाले; मात्र हे फार काळ टिकले नाही. पालिकेच्या राजकारणात जसे रंग बदलत गेले तसे सांस्कृतिक केंद्राच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले. या केंद्राला २००८ ला म्हणजे केवळ ७ वर्षात घरघर लागली. सांस्कृतिक केंद्रात एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू असतानाच व्हरांड्याच्या छताचा काही भाग कोसळला. त्यानंतर अन्य एक कार्यक्रम सुरू असतानाच दोन पंखे निखळून पडले होते. या घटनेनंतर सांस्कृतिक केंद्र डागडुजीसाठी बंद करण्यात आले. तब्बल १५ वर्षे सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरूच आहे. कोट्यवधीचा निधी पालिकेच्या तिजोरीतून दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केला गेला.

हे केंद्र पुन्हा सुरू व्हावे, यासाठी आमदार योगेश कदम प्रयत्न करत होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, अशी मागणी त्यांनी केली होती; परंतु राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी मध्यंतरीच्या काळात घडल्या. त्यात ही मागणी पूर्ण होते की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली. नाट्यमय पद्धतीने राज्यात आघाडी सरकार जाऊन युतीचे सरकार आले तेवढ्याच वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासाठी सढळ हस्ते निधी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला. निधीची तरतूद झाल्याने सांस्कृतिक केंद्राचा पडदा पुन्हा एकदा उघडणार आहे.

----