
श्रीकांत सांबारी यांना आचरा येथे श्रद्धांजली
03376
आचरा ः येथे शोकसभेस उपस्थित मान्यवर.
श्रीकांत सांबारी यांना
आचरा येथे श्रद्धांजली
आचरा, ता. १७ : आचरेतील संस्थांना वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणार सांस्कृतिक क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्व हरपल्याची भावना श्रीकांत सांबारी यांच्या शोकसभेला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांनी काम केलेल्या संस्थांना यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्न हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.
रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कार्य केलेल्या रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, आदर्श व्यापारी संघटना, काकड आरती कार्तिकोत्सव मंडळ, साई सेवा मंडळ या संस्थांतर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रामेश्वर भक्त निवास येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे आणि सांबारी कुटुंबीयांतर्फे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश हडकर, चिंदर ग्रामोन्नती मंडळाचे आत्माराम नाटेकर, रवींद्र गुरव, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे आदींसह अर्जुन बापर्डेकर, बाबल्या भिसळे, विनिता कांबळी, लक्ष्मण आचरेकर, आनंद आचरेकर, सुरेंद्र सकपाळ, उपशिक्षणाधिकारी आंगणे, पांडुरंग कोचरेकर, कोमसापचे रामचंद्र कुबल, विनायक परब, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांसह मंदार सांबारी, रघुनाथ सांबारी, मांगिरीष सांबारी, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, जयप्रकाश परुळेकर, नंदकिशोर सावंत, जगन्नाथ साने आदी उपस्थित होते.