राजापूर अर्बन बॅंकेच्या शाखेचे तळेरेत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर अर्बन बॅंकेच्या 
शाखेचे तळेरेत उद्‍घाटन
राजापूर अर्बन बॅंकेच्या शाखेचे तळेरेत उद्‍घाटन

राजापूर अर्बन बॅंकेच्या शाखेचे तळेरेत उद्‍घाटन

sakal_logo
By

03377
तळेरे ः राजापूर अर्बन बॅंक शाखेच्या उद्‍घाटन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.

राजापूर अर्बन बॅंकेच्या
शाखेचे तळेरेत उद्‍घाटन

तळेरे, ता. १७ : सर्वसामान्यांची बॅंक म्हणून राजापूर अर्बनची ख्याती आहे. ग्राहकांना विनम्र सेवा देण्याचा घेतलेला वसा तळेरे शाखेतही ठेवून भविष्यात ही शाखा अव्वल ठरेल, असा विश्वास अध्यक्ष हनिफ काझी यांनी व्यक्त केला. राजापूर बॅंकेच्या अकराव्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौथ्या शाखेचे उद्‍घाटन येथे रविवारी (१४) उत्साहात झाले.
येथील या नव्या शाखेचे उद्‍घाटन बॅंकेचे माजी अध्यक्ष रवींद्रनाथ ठाकूर-देसाई, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे यांच्या हस्ते, तर बॅंकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, उद्योजक तेजस जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, बॅंकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफ़े, जिल्हा परिषद माजी सदस्य रवींद्र जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे, उद्योजक मनोज महाडीक, कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, तळेरे शाखाधिकारी दुर्गेश बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.