‘सकाळ’च्या सोनवलकरांना ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ’च्या सोनवलकरांना
‘दर्पण’ पुरस्कार जाहीर
‘सकाळ’च्या सोनवलकरांना ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर

‘सकाळ’च्या सोनवलकरांना ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

‘सकाळ’च्या सोनवलकरांना
‘दर्पण’ पुरस्कार जाहीर

देवगड, ता. १७ ः फलटण (सातारा) येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ३० व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थाध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी आज पोंभुर्ले येथे केली. ‘सकाळ’चे प्रतिनिधी शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता. फलटण) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रमाचे (कणकवली) संचालक प्रा. राजेंद्र मुंबरकर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (फलटण) कार्यवाह कवी ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे आदी उपस्थिती होते. प्रारंभी प्रा. मुंबरकर यांच्या हस्ते जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मराठी पत्रकारांच्या कार्याचा सन्मान म्हणून संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण १९९३ पासून केले जात असल्याचे बेडकिहाळ यांनी सांगून यंदाचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना, ‘साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार’ भगवान अंजनीकर (नांदेड) यांना, कराड येथील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत ‘धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ कृतिका (श्वेता) पालव (डोंबिवली) यांना घोषित करण्यात आला. राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य पत्रकारांमध्ये प्रशांत कदम (नवी दिल्ली), डॉ. सागर देशपांडे (कोल्हापूर), श्रीकांत कात्रे (सातारा), शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता. फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण ६ जानेवारीला पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात करण्यात येणार असल्याचे बेडकिहाळ यांनी सांगितले.