-चिपळुणात छ. संभाजी महाराजांना अभिवादन

-चिपळुणात छ. संभाजी महाराजांना अभिवादन

२४ (पान २ साठी)

- ratchl१७१.jpg ः
२३M०३३५५
चिपळूण ः छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादनप्रसंगी मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
-----------------

चिपळुणात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

चिपळूण, ता. १७ ः शहरातील अतिथी ग्रँड सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मराठा समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमात समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय परीक्षांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माहिती गोळा करून त्यानुसार उपक्रमाचे आयोजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
जिजाऊ वंदना गीत गाऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी सतीश कदम, राकेश शिंदे, दिलीप देसाई, प्रकाश देशमुख, सतीश मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे दैदिप्यमान इतिहासातील काही प्रसंग कथन केले. महाराजांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षांमध्ये जो पराक्रम गाजवून अतुलनीय कामगिरी बजावली व स्वराज्यासाठी, धर्मासाठी सर्वोच्च बलिदान केले त्याचा उल्लेख करून सर्वांनी अभिवादन केले. समाजाचा वधू-वर सूचक मंडळ व पतपेढी स्थापन करण्याचाही या वेळी निर्णय घेण्यात आला. सुत्रसंचालन संतोष सावंतदेसाई यांनी केले तर मकरंद जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मालती पवार, दीप्ती सावंतदेसाई, सीमा चाळके, रचना शिंदे, भाग्यश्री चोरगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com