भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्या

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्या

२५ (पान २ साठी, अॅंकर)


-rat१७p२४.jpg-
२३M०३३५३
रत्नागिरी ः सोनाली पाल हिचा सत्कार करताना भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन.
-------------
भाजप जिल्हाध्यक्ष पटवर्धनांच्या तत्परतेमुळे सोनालीचे वाचले प्राण


रत्नागिरी, ता. १७ ः पंधरा वर्षांची मुलगी पोटात अतिशय वेदनांमुळे विव्हळत आहे, खासगी दवाखान्यात ६० हजारांचा खर्च आहे, असा फोन भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना येताच त्यांनी तत्काळ सुत्रे फिरवली. जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधला आणि त्यांनीही तत्परता दाखवत मुलीला अॅडमिट करून घेतले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती पूर्ण बरीसुद्धा झाली. तत्परतेमुळे वेळेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने तिने १५ दिवसांनी अॅड. पटवर्धन यांची भेट घेतली.
अभियान प्रवासात असताना हळदणकर या कशेळी गावातील शक्तीकेंद्र प्रमुखांचा फोन आला. गयाळवाडीत राहणाऱ्या गरीब घरातल्या सोनाली पाल या मुलीच्या पोटात दुखत आहे. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या नार्वेकर नामक महिलेचाही फोन आला. १५ वर्षांची मुलगी विव्हळत आहे, पाहवत नाहीये, सिव्हिलला अॅडमिट करून घेत नाहीत आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ६० हजार खर्च सांगत आहेत, तिचे वडील गरीब आहेत. इतक्या खर्चाचा विचारही करू शकत नाहीत. तुम्ही काहीतरी मदत करा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर अॅड. पटवर्धन यांनी सोनालीची माहिती विचारून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना फोन केला. त्यांनी सोनालीला अॅडमिट करून घेते, उपचारांची व्यवस्था करते, असे आश्वासकपणे सांगितले.
गेल्या ३ वर्षात डॉ. फुले यांनी रुग्णालयात कितीही गर्दी असली तरी खूप सहकार्य केले. सांगितलेल्या रुग्णाला योग्य उपचार होईल, याकडे लक्ष दिले. सोनाली अॅडमिट झाली व डॉक्टरांनी तपासून औषधोपचार सुरू केले. दोन दिवसांनी तिला आराम वाटू लागला व तिला घरी नेऊन दोन दिवसांनी घेऊन या, असे सांगितले. मग घरचे पुन्हा धास्तावले; पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी नीट समजावून सांगितले. शस्त्रक्रिया करावी लागणार होती; पण एक दिवस शस्त्रक्रिया पुढे गेली तरी पालकांना व तिला शल्य चिकित्सकांनी आधार दिला. पोटात मोठी गाठ असावी, हे अनुमान चुकले. पोटात रक्त साकळल्यामुळे दुखत होतं. डॉक्टरांनी आवश्यक ती शस्त्रक्रिया केली आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनीही फोन करून सांगितल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले.
--
कोट
गरीब रुग्णाला योग्य उपचार शासकीय जिल्हा रुग्णालयात देण्याकरिता सहभाग देता आल्याचे समाधान वाटले. रुग्णालयात उपचारांसाठी आवश्यक लागणारे पैसे मी देणार होतो; परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांनी व्यवस्था केली. नीट केलेला पाठपुरावा, जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्सनी केले उपचार यामुळे सोनालीचा प्राण वाचवता आल्याचे समाधान आहे.
- अॅड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com