एसटीची 22 बसस्थानके स्वच्छता अभियानासाठी सज्ज

एसटीची 22 बसस्थानके स्वच्छता अभियानासाठी सज्ज

rat१७p२६.jpg-
०३३६६
रत्नागिरीः पत्रकार परिषदेत माहिती सांगताना विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे.
----------------
स्वच्छता अभियानासाठी २२ बसस्थानके सज्ज
प्रज्ञेश बोरसे ; स्थानकावरील शौचालयांची होणार नियमित स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान वर्षभर राबवण्यात येणार आहे. त्याकरिता रत्नागिरी एसटी विभागातील सर्व आगार, बसस्थानके सज्ज होऊ लागली आहेत. स्वच्छतेचे कंत्राट दिलेले असले तरी जिथे कंत्राटदार नाही तिथे आगारातर्फे कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत सफाई केली जात आहे. रत्नागिरी विभागात ९ आगार असून २२ बसस्थानके आहेत. अ गटात ४, ब गटात ६ आणि क गटात १२ बसस्थानकांचा समावेश आहे. आता वर्षभर विविध संस्थांच्या मदतीने आणि प्रवासी संघटना, पत्रकार यांच्या सूचनांनुसार स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकारांना दिली.
राज्यातील एसटी बसस्थानके स्वच्छ आणि सुंदर दिसावीत यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात दोन कोटीहून अधिक रुपयांच्या रकमेची बक्षिसे एसटी महामंडळाने जाहीर केली आहेत. या अभियानाचा कालावधी एक वर्षाचा आहे. प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळवण्यासाठी स्वच्छतेची चळवळ व्यापक करण्यात येणार आहे.
रत्नागिरीसारख्या मुख्य ठिकाणी रहाटागर बसस्थानकात शौचालयांची दयनीय अवस्था असल्याबाबत विचारले असता बोरसे यांनी सांगितले की, आगार व्यवस्थापक, स्थानकप्रमुख, पर्यवेक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज कामावर हजर झाल्यानंतर आवार व शौचालय पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ परिसर ठेवणे आवश्यक आहे. ऑक्टोबरपासून एसटीच्या अंतर्गत पातळीवर स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आता कोट्यवधींची बक्षिसे असल्याने स्पर्धात्मक वातावरणातून चांगली स्वच्छता होईल.
विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली ३१ समित्या स्थापन होणार आहे. स्वच्छता अभियानासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छता आराखडा तयार करणे, मूल्यांकनासाठी विभागीय समितीला मूल्यांकनासाठी कालबद्ध कार्यक्रम देणे, मूल्यांकनाची माहिती अध्यक्ष, उपाध्यक्षांना द्यावयाची आहे. ५०० पेक्षा फेऱ्यांची ये-जा असलेली बसस्थानके अ वर्गात, २५१ ते ५०० च्या दरम्यान फेऱ्या असलेली ब वर्गात आणि २५० पेक्षा कमी फेऱ्या असणारी बसस्थानके क वर्गात आहेत.
---------
चौकट १
दृष्टिक्षेपात बसस्थानके
बसस्थानकाचे नाव, फेऱ्यांची संख्या (ये-जा), वर्ग या क्रमाने- दापोली ४४० ब, दाभोळ ३० क, हर्णै ६६ क, खेड ५२० अ, चिपळूण (जुना) ३७ क, चिपळूण (नवीन) ७२४ अ, चिपळूण (शिवाजी नगर) १९२ क, सावर्डे ८६ क, गुहागर ३०६ ब, देवरूख ४२४ ब, संगमेश्वर २०६ क, साखरपा ७२ क, माखजन ७० क, रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक (नवीन बांधणी सुरू) ७०० अ, रत्नागिरी रहाटागर १३२४ अ, पावस ४८४ ब, गणपतीपुळे ७० क, जाकादेवी २०४ क, लांजा ३८४ ब, पाली ४४८ ब, राजापूर २३४ क, मंडणगड २३५ क.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com