जिल्हा परिषदेतील 
45 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील 45 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील
४५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
अकरा जणांच्या बदल्या टळल्या
ओरोस, ता. १७ ः आंतरजिल्हा शिक्षक बदलीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियाही सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ४५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज केल्या. यात २९ प्रशासकीय, २४ विनंती आणि दोन आपापसात बदल्यांचा समावेश आहे.
शासन निकषानुसार बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेमध्ये करीत असतात. त्यानुसार ही प्रक्रिया झाली. नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह विभागांचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते. शासन निकषानुसार एकूण कार्यरत कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय बदलीसाठी पात्र असलेल्या ३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित होते; परंतु केवळ १९ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११ कर्मचारी ५३ वर्षांवरील किंवा अपंग असल्याने त्यांच्या बदल्या केल्या नसल्याचे सांगण्यात आले. विनंती बदलीसाठी ८३ कर्मचारी पात्र होते. त्यातील २४ कर्मचाऱ्यांनी बदली स्वीकारली. तर आपापसात समन्वय साधून दोन कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या आस्थापनेवरील बदली मागितली होती, ती नायर यांनी मंजूर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com