
सविता नागवेकर यांचे निधन
rat१७p३२.jpg-
KOP२३M०३४१६
सविता नागवेकर
--------------
सविता नागवेकर यांचे निधन
रत्नागिरी, ता. १७ः तालुक्यातील हातिस येथील सविता बाळकृष्ण नागवेकर (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांनी ६० वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांना गुरुवारी (ता. १८) शोकसभेत आदरांजली वाहण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी टेंभ्ये माध्यमिक विद्यालयाला ६ लाख रुपयांची देणगी देऊन वडील (कै.) हातिसकर मास्तरांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचे नामकरण (कै.) बाळकृष्ण रामजी तथा हातिसकर मास्तर माध्यमिक विद्यालय असे २००६ मध्ये करण्यात आले. (कै.) चंद्रभागा व बाळकृष्ण हातिसकर यांच्या स्मरणार्थ अडीच लाख रुपये खर्च करून हातिस गावच्या स्वागताची कमान बांधून दिली होती. पीर बाबरशेख मंदिरासाठी त्यांनी ३२ हजार २०० रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम दिली होती. हातिस गावातील शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला सविताताईंनी २५ हजार रुपयांची देणगी दिली होती.