रत्नागिरी ः क्राईम पट्टा

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

वांझोळे अपघातप्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः वांझोळे घाटात पाटोळे क्रशर वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या चालकाविरुद्ध देवरूख (ता. संगमेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास जयवंत यादव (रा. आदिष्टी उबटआळी, पो. वळम, ता. महाड, जि. रायगड) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास वांझोळे येथील वळणावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा आराम बस (एमएच ०४, जीपी ६०८२) घेऊन देवगड ते मुंबई अशी वाटूळ-साखरपा देवरूख-संगमेश्वरमार्गे मुंबईकडे जात होता. रस्ता उताराचा व वळणाचा हे माहित असतानाही निष्काळजीपणे वाहन चालवून देवरूख येथून लांजाकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच०८, एपी ५९१७) धडक दिली. या अपघातात ३०० मीटर अंतराच्या वळणावर बस उलटली. त्यातील प्रवाशांच्या लहान-मोठ्या दुखापतीस चालक कारणीभूत झाला व दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आराम बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलिस ठाणे अंमलदार करत आहेत.
---------
फुणगूस येथे हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे फुणगूस देसाईवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारू बाळगणाऱ्याविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान आबा देसाई (वय ६९, रा. मेढेतर्फे फुणगूस, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १६) रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे ४७५ रुपयांची ९ लिटर विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी पोलिसांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस अंमलदार करत आहेत.
-------
रेल्वेत प्रवासी महिलेचे दागिने चोरले
रत्नागिरी ः सावंतवाडी ते दिवा जाणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या पर्समधील १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १४) मे रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास खेड रेल्वेस्टेशन प्लॅटफार्म येथे सावंतवाडी ते दिवा गाडीत घडली. फिर्यादी या गाडीत चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून पर्सच्या आतील कप्प्यातील प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले १ लाख ३० रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. या प्रकरणी फिर्यादी महिलेने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खेड पोलिस ठाणे अंमलदार करत आहेत.
-------

कन्साई नेरोलॅक कंपनीत चोरी
खेड ः तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कन्साई नेरोलॅक या रंगाच्या कंपनीतून दोन रंगाचे डबे चोरल्याप्रकरणी आकाश आरूढ पचाळ, रोशन रामचंद्र शिगवण या दोघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सोमवारी (ता.१५) मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास घडली. लोटे औद्योगिक क्षेत्रातील कन्साई नेरोलॅक कंपनीत संशयितांनी आपल्या दुचाकी (एमएच ०८, एए ४५१८) हिचा वापर करत कंपनीच्या कंपाउंड वॉलवरून कंपनीच्या बंद असलेल्या वॉटरबेसच्या युनिटमध्ये प्रवेश करून २ रंगाचे डबे चोरून नेले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
--------
भरणे, मुळगांवमध्ये हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड
खेड ः तालुक्यातील भरणे बाईतवाडी आणि खाडीपट्ट्यातील मुळगांव येथील देऊळवाडीमध्ये बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ४३ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूचे रसायन ३५ लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये जप्त केले. या प्रकरणी नंदकुमार धनंजय वारेकर (वय २८, रा. मुळगांव देऊळवाडी) तर दत्ताराम धोंडू लाड (वय ५३, रा. भरणे बाईतवाडी) यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com