शिवछत्रपती पुरस्कारासाठी आरती, अपेक्षा ला नामांकन

शिवछत्रपती पुरस्कारासाठी आरती, अपेक्षा ला नामांकन

५ (पान ३ साठी, अॅंकर)


- rat१७p३८.jpg-
२३M०३४२२
अपेक्षा सुतार
- rat१७p३९.jpg-
२३M०३४२३
आरती कांबळे
--------
शिवछत्रपती पुरस्कारासाठी आरती, अपेक्षाला नामांकन

लवकरच अधिकृत घोषणा ः जिल्ह्याचा दुहेरी सन्मान

रत्नागिरी, ता. १७ ः राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ठ आंतराष्ट्रीय खो-खोपटू अपेक्षा अनिल सुतार, आरती अनंत कांबळे यांची राज्य निवड समितीने खो-खो खेळासाठी नामांकने जाहिर केली आहे. लवकरच राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मात्र एकाच वेळी खो-खोच्या दोन खेळडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी उत्तेजन देणे हा पुरस्कार देण्यामागील उद्देश आहे. शासनाकडे प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर अंतिम टप्प्यात वेबसाईटवर नावे जाहिर केली जातात. त्यानंतर काही कालावधीने पुरस्कारप्राप्त खेळाडूंची नावे जाहीर केली जातात. २०१९-२० या वर्षासाठी खोखोपटू आरती कांबळे हिची तर २०२१-२२ या वर्षासाठी अपेक्षा सुतार हिच्या नावाचे नामांकन राज्य निवड समितीने केले आहे. २२ मे नंतर राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत पुरस्कारांची अधिकृत घोषणा होईल. रत्नागिरीतील रा.भा. शिर्के प्रशालेच्या दोन्ही विद्यार्थींनी असून यापूर्वी शिर्के प्रशालेच्याच ऐश्वर्या यशवंत सावंत हिलाही खो-खोतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय खो-खो मार्गदर्शक पकंज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले, तर त्यांच्या जडणघडणीत राज्याचे माजी सचिव संदीप तावडे, शिर्के प्रशालेचे विनोद मयेकर यांचा मोलाचा वाटा आहे. पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत, राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय उर्फ बाळू साळवींसह सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
-------
खो-खोतील प्रवास
आरती कांबळे हिने सातवीपासून खो-खो खेळत आहे. शालेय स्पर्धेतून सहभाग नोंदवत तीने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी केली. कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आरतीने आतापर्यंत सुमारे ६० हून अधिक स्पर्धांत खेळ केला आहे. सहा राष्ट्रीय खो-खो स्पर्धा तर ४ फेडरेशन चषक स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. अपेक्षा सुतार चे माध्यमिक शिक्षण शिर्के प्रशालेतूनच पूर्ण झाले. पदवीधर असलेली अपेक्षा चौथी इयत्तेपासून खो-खोच्या मैदानावर आहे. ४ थ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय खो-खो संघात प्रतिनिधित्व केले होते. तर नेपाळ, काठमांडू येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. तिने राष्ट्रीयस्तरावरील मानाचा जानकी आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कारही पटकाविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com