सावंतवाडीत पत्रकार, कुटुंबीयांची नेत्र चिकित्सा

सावंतवाडीत पत्रकार, कुटुंबीयांची नेत्र चिकित्सा

swt१८८.jpg
M03618
सावंतवाडी : नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करताना नँबचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर. सोबत डॉ. विनया बाड, गजानन नाईक, हरिश्चंद्र पवार, सागर चव्हाण, उदय भोसले, नीलिमा चलवाडी, दीपाली भालेकर व अन्य.

सावंतवाडीत पत्रकार, कुटुंबीयांची नेत्र चिकित्सा
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादः तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः येथील तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा १०० हून अधिक पत्रकार व कुटुंबीयांनी लाभ घेतला.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील तालुका पत्रकार संघ, नॅब संस्था, रोटरी क्लब आणि मुक्ता ऑप्टिशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटपाचा कार्यक्रम काल (ता. १७) भटवाडी येथील नॅबच्या नेत्र रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नॅबचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक होते. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षा डॉ. विनया बाड, नँब सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर, नीलिमा चलवाडी, मुक्ता ऑप्टिशियन्सचे रवी लोखंडे, उद्योजक उदय भोसले, डॉ. सुप्रिया भावके, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार उपस्थित होते.
यावेळी उदय भोसले यांनी राजकारणात काम करत असताना समाजकारणाची ओढ निर्माण झाली होती. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यावेळी अंगिकारला होता. समाजासाठी काम करताना वेगळा आनंद मिळतो, असे सांगितले. तर रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. विनया बाड म्हणाल्या, ‘‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी गेली अनेक वर्षे काम करत आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप कार्यक्रमाचा पत्रकार संघाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. येणाऱ्या काळात देखील पत्रकार संघाच्या सामाजिक उपक्रमांत रोटरी क्लबचा सहभाग राहील.’’
नॅबचे जिल्हाध्यक्ष उचगावकर यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड युनिट महाराष्ट्रच्या माध्यमातून येथील भटवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाबद्दल माहिती दिली. याठिकाणी असणारी सुसज्ज यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचा सावंतवाडीकरांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करत बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात सिंधुदुर्गचे सुपुत्र आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत त्यांचे स्मारक असणाऱ्या सिंधुदुर्ग पत्रकार भवनाच्या वाटचालीबद्दल भावना व्यक्त केल्या. चोविस तास समाजासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पत्रकार संघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या कारकीर्दीतील पहिलाच कार्यक्रम यशस्वी ठरल्याबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी मोफत नेत्र तपासणी नॅब सिंधुदुर्ग, मोफत चष्मे वाटप मुक्ता ऑप्टिशियन, नेत्र चिकित्सा रोटरी क्लब यांच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, नीलिमा चलवाडी, रवी जाधव यांचे विशेष सहकार्य या लाभले.
याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, उद्योजक उदय भोसले, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, पत्रकार सागर चव्हाण, पत्रकार संघ माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, अॅड. संतोष सावंत, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, नीलिमा चलवाडी, डॉ. सुप्रिया भावके, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष काका भिसे, दीपक गावकर, प्रसन्न राणे, सहसचिव विनायक गावस, रमेश बोंद्रे, विजय देसाई, नरेंद्र देशपांडे, हेमंत खानोलकर, हर्षवर्धन धारणकर, बंटी उसगावकर, रुपेश हिराप, राजू तावडे, सचिन रेडकर, उमेश सावंत, शैलैश मयेकर, मंगल कामत, नागेश पाटील, आनंद धोंड, सिद्धेश सावंत, शुभम धुरी, अशोक बोलके, प्रसाद माधव, अनुजा कुडतरकर, अनुराधा पवार, संजना निवळे, सुनीता ठाकूर, स्नेहल चराठकर, वैभव सावंत, अजित दळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी, आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com