''कलरफुल कोकण''मधून घडणार संपन्नतेचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''कलरफुल कोकण''मधून घडणार संपन्नतेचे दर्शन
''कलरफुल कोकण''मधून घडणार संपन्नतेचे दर्शन

''कलरफुल कोकण''मधून घडणार संपन्नतेचे दर्शन

sakal_logo
By

swt182.jpg
03537
बनी नाडकर्णी, दिगंबर नाईक

‘कलरफुल कोकण’मधून
घडणार संपन्नतेचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः कोकण आपल्या अभिजात निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. नारळी पोफळीच्या बागा, समुद्राचा गाज, हिरवीगर्द झाडी, गौरवशाली इतिहास यांच्यासह सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा कोकणला लाभला आहे. अशाच निसर्गरम्य कोकणची सफर जिल्हावासीयांना मँगो व्हिलेज गुहागर प्रस्तुत ‘कलरफुल कोकण’मधून घडणार आहे. याचे पहिले दोन भाग कालपासून (ता. १७) प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. सहा भागांच्या या शोची निर्मिती येथील जगन्नाथ उर्फ बनी नाडकर्णी आणि स्वप्ना चंदावरकर यांनी केली आहे.
कोकणातील पुरातन मंदिरे, अथांग समुद्र, कोकणची लोककला, पारंपरिक खाद्यसंस्कृती, पर्यटन स्थळे एकंदरच कोकणची संस्कृती या ''कलरफुल कोकण''मध्ये अनुभवायला मिळणार आहे. याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी केले आहे. याबाबत प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ‘‘मराठी संस्कृतीमध्ये विविधता आहे. अंतराअंतरावर भाषा बदलते. महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य आहे. असेच निसर्गसौंदर्याचे लेणे लेवून आलेले ठिकाण म्हणजे कोकण आहे. कला, साहित्य व संस्कृतीच्या आविष्कारांनींही समृद्ध असे हे कोकण पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. येथील साहित्य संपदाही विपुल आहे. इथले लोक उत्सवप्रिय असून आजही गणेशोत्सव, शिमगोत्सव, यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. कोकणातील हीच वैविध्यतेने नटलेली संस्कृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा यामागचा मुख्य हेतू आहे.’’