आर्या होळकर यांना
हिंदी प्रचारक पुरस्कार

आर्या होळकर यांना हिंदी प्रचारक पुरस्कार

येणे आहे...

टीपः swt१८१०.jpg मध्ये फोटो आहे.
सरंबळ ः आर्या होळकर यांचा सत्कार करताना पद्मश्री परशुराम गंगावणे, विवेकानंद बालम आदी.

आर्या होळकर यांना
हिंदी प्रचारक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्यावतीने देण्यात येणारा २०२२-२३ चा आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार सरंबळ इंग्लिश स्कूलच्या आर्या होळकर यांना पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम, प्रमुख पाहुणे स्टेट बॅंक ऑफ इंडिया प्रबंधक आदित्य पाठक, माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, कैलास जाधव, हिंदी मंडळ अध्यक्ष श्री. कांबळे, कमलेश गोसावी, दीपक तारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आर्या होळकर यांनी गेली १४ वर्षे हिंदी विषयाचे अध्यापन करताना हिंदी दिन साजरे करणे, हिंदी हस्तलिखित ''कस्तुरी''ची निर्मिती, जिल्हास्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेत तीन वेळा प्रथम क्रमांक, हिंदी परीक्षक म्हणून उत्तम कामगिरी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली दहा वर्षे हिंदी विषयाची बाह्य व्याख्याने अशा उल्लेखनीय योगदान दिले. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल सरंबळ ग्रामस्थ समता संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राऊत, सरचिटणीस राजेंद्र परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखाचिटणीस प्रसाद साटम, मुख्याध्यापक अनिल होळकर, सर्व शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com