मसुरे-डांगमोडे विद्यामंदिराचा
शतवार्षिकोत्सव उत्साहात

मसुरे-डांगमोडे विद्यामंदिराचा शतवार्षिकोत्सव उत्साहात

३५०८

मसुरे-डांगमोडे विद्यामंदिराचा
शतवार्षिकोत्सव उत्साहात
विविध कार्यक्रम ः विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. 16 : मसुरे-डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या शतवार्षिकोत्सवात रात्री विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्यातील अंगभूत कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या शतवार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला.
तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरचा शतवार्षिकोत्सव नुकताच विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. प्रशालेच्या या शतवार्षिकोत्सवाच्या निमित्ताने प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय विभाग सुरु करण्यात आला. शतवार्षिकोत्सवाचा उद्घाटनाचा समारंभ पार पडल्यानंतर प्रशालेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्स, कोळीनृत्य, हिंदी मराठी गाण्यावरील नृत्य, नाट्य छटा, मिमिक्री सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. या निमित्ताने गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. यात सुरेंद्रनाथ ठाकूर, काशिनाथ भिकाजी ठाकूर, पार्वती शंकर दीक्षित, सुनंदा एकनाथ ठाकूर, सुशीला राघू ठाकूर, कल्याण दिनकर ठाकूर, अशोक जगन्नाथ ठाकूर, अनाजी जगन्नाथ ठाकूर, शैलजा मधुसूदन ठाकूर, सौ. ठाकूर, विलास भागोजी ठाकूर, राघो मोतीराम ठाकूर, अरुण सहदेव ठाकूर, रविकांत जनार्दन ठाकूर, दत्तात्रय भागोजी ठाकूर, बाळप्रकाश अंकुश ठाकूर, सुलभा यशवंत ठाकूर, मधुसूदन डांगमोडेकर, सखाराम हिंदळेकर, मायावती कदम, सिंधू बाईत, अंकुश ठाकूर, पुष्पावती ठाकूर, बाळा मेस्त्री, आबा पेंडूरकर, प्रकाश ठाकूर, दत्ताराम कदम यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांचा बाळ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र ठाकूर आणि हेमंत ठाकूर या बंधूनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यात ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘श्री देव रवळनाथ... डांगमोडे’ आणि ‘फांदीवरले पक्षी’ हा कविता संग्रह तसेच हेमंत ठाकूर यांचे ‘सिंधुदुर्गनगरी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. रात्री दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com