
उमराठ क्रिकेट स्पर्धेत श्री भराडा संघ विजयी
१५ (टुडे पान ३ साठी)
-rat१८p८.jpg ः
२३M०३५१८
गुहागर ः संघ विजेता श्री भराडा संघाचा चषक देऊन सन्मान करण्यात आला.
-----
उमराठ क्रिकेट स्पर्धेत श्री भराडा संघ विजयी
गुहागर, ता. १८ ः उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या सहकार्याने सरपंच चषक उमराठ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा १३ आणि १४ मे रोजी बाऊल नगरीत खेळवण्यात आल्या. या स्पर्धेत आंबेकरवाडीच्या श्री भराडा क्रिकेट संघ विजेता ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. १३) सकाळी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गावातील वाड्यांचे वाडीप्रमुख, प्रतिष्ठित ग्रामस्थ महिला, पुरुष मंडळी आणि प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यामध्ये गावातील १२ संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत अंतिम विजेतेपदाचे मानकरी आंबेकरवाडीचा श्री भराडा क्रिकेट संघ आणि उपविजेता डागवाडीचा जागलेश्वर क्रिकेट संघ ठरला. मॅन ऑफ दी सीरिज ओंकार आंबेकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज अमित आंबेकर तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरले .शेखर आंबेकर.
या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते श्री भराडा क्रिकेट संघातून पवन आंबेकर, शिल्पकार संघातून आयुष कदम, जालगावकर क्रिकेट संघातून यश कदम, यश जालगावकर, कोंडवीवाडी क्रिकेट संघातून राज गावणंग आणि गोरिवलेवाडी क्रिकेट संघातून भावेश गोरिवले, संस्कार गोरिवले आणि संचित गोरिवले हे १२ आणि १२ वर्षांखालील खेळणारे नवोदित किशोरवयीन खेळाडू यांचे आंबेकर यांनी खास सन्मान केला. उमराठ गावातील खेळाडूंना व्यासपीठ निर्माण व्हावे, सर्व खेळाडूंना आपलं खेळ कौशल्य सादर करता यावे आणि प्रोत्साहन मिळावे, शहरी भागातील खेळाडू गावाकडे यावेत या हेतूने सरपंचांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.