धनगर समाजाने संघटित होण्याची गरज

धनगर समाजाने संघटित होण्याची गरज

१९ (टुडे पान ३ साठी)

धनगर समाजाने संघटित व्हावे ः काकडे

रत्नागिरी, ता. १८ ः धनगर समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असून, आजही धनगर समाज संघटित नसल्यामुळे धनगर समाजाचे विविध प्रश्न सुटत नाहीयेत. समाज आजही अंधारात आहे. समाजाला प्रकाशाकडे न्यायचे असेल तर धनगर समाजाने शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
दरवर्षी रत्नागिरीसह सर्व जिल्ह्यांतील धनगरवाड्यांतील विद्यार्थ्यांना ते शालेय साहित्य देऊन मदत करतात. या संबंधी ते म्हणाले, धनगर समाजाला खूप मोठा असा अलौकिक इतिहास असतानासुद्धा धनगर समाजाला विविध क्षेत्रातून हद्दपार करण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करत आहेत. या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. अशा राजकीय नेतेमंडळींपासून धनगर समाजाने सावध राहिले पाहिजे. धनगर समाजाने लाचारी व गुलामगिरी जीवन न जगता स्वाभिमानाने जगले पाहिजे. अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेपासून लांब राहावे. धनगर समाजाचा मतासाठी वापर राजकीय नेते व पक्ष करत असल्याची टीकाही काकडे यांनी केली. आगामी काळात समाजाला शैक्षणिक चळवळीकडे नेण्याचे काम केले पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल. त्यांच्यासमवेत सागर गावडे, उमेश गावडे, धनाजी गावडे, प्रशांत गावडे, महिपती गावडे, गुंडा गावडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com