सडुरे आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक सेवेची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडुरे आरोग्य केंद्रामध्ये 
अत्यावश्यक सेवेची ग्वाही
सडुरे आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक सेवेची ग्वाही

सडुरे आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक सेवेची ग्वाही

sakal_logo
By

०३५४६

सडुरे आरोग्य केंद्रामध्ये
अत्यावश्यक सेवेची ग्वाही
उपोषणाची दखल; ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ ः सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील, असे आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर चार गावांतील सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
विनामोबदला दिलेल्या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात यावी आणि सडुरे येथे सुरू असलेल्या केंद्रात अत्यावश्यक सेवा सुविधांच्या मागणीसाठी येथील तालुका आरोग्य कार्यालयाबाहेर सडुरे माजी सरपंच विजय रावराणे यांच्यासह निमअरुळे सरपंच सज्जन माईणकर, सडुरे सरपंच दीपक चव्हाण, अरुळे सरपंच मानसी रावराणे, कुर्ली सरपंच विजया पवार, नंदकुमार रावराणे, सुरेश बोडके, डी. के. सुतार, अंबाजी हुंबे, आप्पा सुतार आदींनी उपोषण सुरू केले. या उपोषणकर्त्यांशी दुपारी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी चर्चा केली. त्यांनी इमारतीसंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी देखील उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बाह्यरुग्ण विभागात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील, असे लेखी आश्वासन श्री. पवार यांनी दिले. तसे लेखी पत्र त्यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर सकाळपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.