
टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
१४ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा)
अमृतकुंभ अभियानांतर्गत आज भाजपचा मेळावा
रत्नागिरी : स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान शुक्रवारी (ता. १९) प्रदेश संयोजक, माजी आमदार मधू चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत राबवण्यात येणार आहे. स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियान सुरू करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. जनसंघ ते भाजपा अशा प्रतिकुल परिस्थितीत महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची नवी पिढी उभारण्यात स्व. उत्तमराव तथा नानासाहेब अग्रेसर होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली व प्रतिकूल परिस्थितीतही पक्ष तळागाळापर्यंत वाढविला. कर्मयोगी नानांनी भाजपाचे पहिले अध्यक्षपद भूषविले होते. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा कार्यालयात शुक्रवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला जनसंघापासून कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
---
पालखी नृत्य स्पर्धेत पद्मावती मार्गताम्हाणे प्रथम
खेड ः तालुक्यातील धामणदेवी येथे आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्यस्पर्धेत पद्मावती मार्गताम्हाणेने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेसाठी राज्यस्तरावर अनेकवेळा चमकलेल्या जिल्हाभरातील पालखी नृत्यमंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पद्मावती मार्गताम्हणे (प्रथम), सतीश चिंचगरी (द्वितीय, चिपळूण), गांगोबा पालखी नृत्य करंबेळे (तृतीय, संगमेश्वर) या मंडळांनी पटकावले. उत्कृष्ट देखावा (पाटगाव मंडळ), उत्कृष्ट झांजवादक (पद्मावती), उत्कृष्ट सनईवादक (करंबेळे गांगोबा), उत्कृष्ट ताशावादक (सती चिंचघरी), उत्कृष्ट ढोलवादक (करंबेळे गांगोबा) अशी पारितोषिके मिळाली. या कार्यक्रमप्रसंगी यावर्षीचा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले धामणदेवी नं. १ शाळेचे शिक्षक संतोष जाधव व सुमन विद्यालय टेरवचे राज्य पुरस्कार आदर्श शिक्षक अमोल टाकळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच संजीवनी नरळकर, मनसे खेड तालुकाप्रमुख नाना चाळके, अभिनव भुरण, सरपंच आरूषी शिंदे, वालोपे सरपंच काजवे, अजिंक्य आंब्रे उपस्थित होते
--
लेफ्टनंट जनरल गवस यांची तिसंगीला भेट
खेड ः तालुक्यातील कुंभाडचे सुपुत्र व कर्नल अशोक भोसले यांचे व्याही लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस यांनी तिसंगीला भेट दिली. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नवानगर वीरस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर सैनिक भवनला भेट दिली. या वेळी गवस यांनी तरुण-तरुणींनी सैन्यात भरती व्हावे, असे आवाहन केले. या प्रसंगी कॅ. गुलाब भोसले, नरसिंग भोसले, राजेंद्र भोसले, कॅ. अनंत भोसले, विष्णू भोसले, दिलीप भोसले उपस्थित होते.