पीएनजीतर्फे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएनजीतर्फे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन
पीएनजीतर्फे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन

पीएनजीतर्फे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे विविध ठिकाणी आयोजन

sakal_logo
By

03562

‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे
‘पीएनजी’तर्फे आयोजन

देवरुख, लांजा, चिपळुणात रंगणार खेळ

चिपळूण, ता. १९ ः सांगलीतील १९१ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या कोकणात रत्नागिरी आणि चिपळूण येथे शाखा आहेत. या पेढीतर्फे जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा- संधी पैठणी जिंकण्याची’ हा कार्यक्रम देवरुख, लांजा आणि चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
देवरुख येथे रविवारी (ता. २१) लक्ष्मी-नृसिंह मंगल कार्यालय, बझार पेठ याठिकाणी; तर लांजा येथे सोमवारी (ता. २२) शहनाई हॉल, मुंबई-गोवा महामार्गालगत याठिकाणी; तसेच चिपळूण येथे मंगळवारी (ता. २३) माधव सभागृह, चिंचनाका या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा खेळ रंगणार आहे. साऱ्या घराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर उचलणाऱ्या महिलांनासुद्धा एक विरंगुळा मिळावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेवून ‘पीएनजी’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सहभागी महिलांना पैठणी आणि अन्य अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘पीएनजी’तर्फे करण्यात आले आहे.