वंदे भारत रेल्वेला मडगावमध्ये पंतप्रधान 29 रोजी

वंदे भारत रेल्वेला मडगावमध्ये पंतप्रधान 29 रोजी

६ (टुडे पान १ साठी)


-rat१८p१९.jpg-
२३M०३५६९
रत्नागिरी : मुंबई- गोवा ट्रॅकवर धावणारी वंदे भारत रेल्वे.
-----

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत

पंतप्रधान मोदी मडगावमध्ये २९ ला दाखवणार झेंडा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मे रोजी मडगाव येथे हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्याने रेल्वे मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत सेवा सुरू करीत आहे.
याआधी मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. मुंबई-गोवा वंदेभारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी पाचवी सेमी हाय स्पीड ट्रेन असेल. चेन्नईस्थित कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत तयार झाली आहे. पहिली वंदे भारत ट्रेन फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली ते वाराणसी या ट्रॅकवरून धावली होती.
वंदे भारत अत्याधुनिक असून यात स्वयंचलित दरवाजे, वायफाय, जीपीएस आधारित प्रवाशांना माहिती, आरामदायी आसने, एरोडायनामिकल डिझाईन आणि ३० टक्के ऊर्जाबचत यामुळे वंदे मातरम् दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या ट्रेनला इलेक्ट्रिक मल्टी ट्रेन संबोधले जाते. युनिट लवकरच देशात ७५ वंदे मातरम ट्रेन सुरू होणार आहेत. पहिली वंदे यापूर्वी जर्मन बनावटीची तेजस प्रथम कोकण रेल्वे ट्रॅकवर धावली.
----
कोट
वंदे भारत ट्रेन मुळे कोकणचा आर्थिक विकास होवून पर्यटनाला चालना मिळेल. अत्यंत प्रतिष्ठेची व वेगवान वंदेभारत कोकण रेल्वे ट्रॅकवरून सुरू होते ही समस्त कोकणवासीयांना आनंदाची गोष्ट आहे.
- ॲड. विलास पाटणे, कोकणचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com