
गणपतीपुळेत होतेय वाहतूककोंडी!
७ (टुडे पान १ साठीमेन)
- rat१८p२१.jpg-
२३M०३५७१
गणपतीपुळे ः येथील मुख्य रस्त्यावर झालेली वाहतूककोंडी.
- rat१८p२२.jpg ः
२३M०३५७७
किनाऱ्यावर असलेली पर्यटकांची गर्दी. (छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे)
---
गणपतीपुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल
वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; पाणीयोजना, गटारांच्या कामांचा अडथळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः ऐन हंगामात सुरू असलेल्या कामांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांना दिवसातून एकदा तरी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पर्यटन आराखड्यात मंजूर झालेली कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. सध्या पाणीयोजना आणि गटारे यांची कामे सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक गणपतीपुळे येथे दररोज येत असल्याने प्रचंड गर्दी आहे. चारचाकी, खासगी बस या मार्गावर गुरुवारी (ता. १८) दुपारी ही कोंडी झाली.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे. शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्ट्यांमुळे १५ हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळेत येतात. सोमवारी थोडी गर्दी कमी झाली असली तरीही दररोज १२ हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन जात आहेत. बहुसंख्य पर्यटक खासगी बस, चारचाकी गाड्यांद्वारे फिरायला बाहेर पडतात. गणपतीपुळे येथे सध्या विकासकामे वेगाने सुरू आहेत. गुरुवारी (ता. १८) गटार दुरुस्तीच्या कामामुळे वाहने सागरदर्शन येथे पार्क केली जात होती. मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तिकीट नाक्याजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पर्यटकांनी निःश्वास सोडला. येथे सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराकडे जाणारी वाहने सोडली जाणार आहेत. वाहतूक कोंडी होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गणपतीपुळे येथे सुरू असलेली कामे उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी करावीत, अशी मागणी स्थानिकांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली होती. त्यानंतर ही कामे वेगाने पूर्ण केली असती तर आता रस्ते मोकळे राहिले असते. अरुंद रस्ते असल्याने यामधून दोन मोठ्या गाड्या नेताना कसरत करावी लागते. सध्या गणपतीपुळेमध्ये सांगली, कोल्हापूरसह सातारा येथील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा त्यात वाढ होईल, असे व्यावसायिकांचे मत आहे.
--------------
कोट
गणपतीपुळे गावात सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी ६ फेब्रुवारीला एका पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही कामे संथगतीने सुरू राहिली. परिणामी, हंगामात पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.
- प्रमोद केळकर, लॉजिंग व्यावसायिक