दहावी परीक्षेत यश

दहावी परीक्षेत यश

२६ (पान २ साठी)

-rat१८p१२.jpg-
२३M०३५२७
रत्नागिरी ः दहावीच्या परीक्षेत यश मिळवणारे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी.
-----------
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या
दहावीचा १०० टक्के निकाल

रत्नागिरी ः सीबीएसई बोर्डाच्या फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातून ३७ विद्यार्थी बसले. अभिषेक पाटील याने ९७.६ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. हर्ष पाटीलने ९७.४ टक्के (द्वितीय), जागृती मसुरकर ९६.६ टक्के (तृतीय).
अभिषेक पाटील याने गणित विषयात १०० पैकी १००, हर्ष पाटील, जागृती मसूरकर आणि कृष्णा कुलकर्णी यांनी आयटी विषयात १०० पैकी १०० गुण संपादन केले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
--------
-rat१८p११.jpg-
२३M०३५१४
रत्नागिरी ः रत्नागिरी नगरपालिकेला प्राप्त झालेल्या अग्निशामक वाहनाचे गुरूवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पहिल्या छायाचित्रात श्रीफळ वाढवताना अग्निशामक कर्मचारी, दुसऱ्या छायाचित्रात अद्ययावत अग्निशामक वाहन.
-

रत्नागिरी पालिकेला मिळाले नवे अग्निशमन वाहन

रत्नागिरी ः रत्नागिरी नगरपालिकेला नवीन अग्निशमन वाहन खरेदीसाठी ५५ लाख रुपये मंजूर झाले होते. या अनुदानातून रत्नागिरी पालिकेने नवीन अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. या वाहनाची पाणी साठवणूक क्षमता पाच हजार लिटर असून, त्यात फोम वापराचीही सुविधा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अग्निशामक वाहनाचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com