शीळमधील क्रिकेट स्पर्धेत विल्ये संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीळमधील क्रिकेट स्पर्धेत विल्ये संघ विजेता
शीळमधील क्रिकेट स्पर्धेत विल्ये संघ विजेता

शीळमधील क्रिकेट स्पर्धेत विल्ये संघ विजेता

sakal_logo
By

२८ (पान ५ साठी)

-rat१८p१६.jpg ः
२३M०३५५६

राजापूर ः विजेत्या विल्ये संघाला आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवताना सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वासुदेव गोंडाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अनिल भोवड आणि मान्यवर.
----------

शीळमधील क्रिकेट स्पर्धेत विल्ये संघ विजेता

राजापूर, ता. १८ ः शहरानजीकच्या शीळ येथील सर्वोदय प्रतिष्ठान, साई नवलाई क्रिकेट संघ आणि एनसीसी शीळ यांच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विल्ये संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे महालक्ष्मी दोनिवडे संघ उपविजेता ठरला तर शिवांश स्पोर्टस आणि ओणी संघाने अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना आकर्षक चषकासह रोख रक्कमेचे बक्षिस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्पर्धेच्या बक्षिस समारंभाला सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वासुदेव गोंडाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अनिल भोवड, राजेश मांडवकर, सुरेश पळसमकर, समालोचक अमोल जमदाडे, गणेश करंडे आदी उपस्थित होते. विजेत्या विल्ये संघाला रोख ५१ हजार आणि चषक, उपविजेत्या महालक्ष्मी दोनिवडे संघाला रोख २५ हजार आणि चषक तर तृतीय क्रमांक विजेता शिवांश स्पोर्टस आणि चतुर्थ क्रमांक विजेता ओणी संघाला रोख प्रत्येकी पाच हजार आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
......