गोळपमधील पोटनिवडणुकीसाठी 29.53 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळपमधील पोटनिवडणुकीसाठी 29.53 टक्के मतदान
गोळपमधील पोटनिवडणुकीसाठी 29.53 टक्के मतदान

गोळपमधील पोटनिवडणुकीसाठी 29.53 टक्के मतदान

sakal_logo
By

३९ (पान ५ साठी)


-rat१८p२७.jpg-
२३M०३६१५
गोळप (ता. रत्नागिरी) ः गोळपमधील पोटनिवडणुकीसाठी मतदानासाठी लागलेली रांग.
------------
गोळप पोटनिवडणुकीसाठी २९.५३ टक्के मतदान

दोन महिलांमध्ये लढत ; शिवसेनेविरुद्ध ठाकरे सेनेत चुरस

पावस, ता. १८ ः रत्नागिरी तालुक्यात गोळप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये प्रभाग एकमध्ये ठाकरे गटविरुद्ध शिवसेना गट यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. गुरुवारी (ता. १८) झालेल्या पोटनिवडणुकीसाठी गोळपमधील डोंगरेवाडी प्राथमिक शाळेतील केंद्रावर २९.५३ टक्के मतदान झाले.
दोन वर्षांपूर्वी या ग्रामपंचायतीमध्ये १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी शिवसेनाविरुद्ध गाव पॅनेल असा रंगतदार सामना झाला होता. यामध्ये गावपॅनेलचे दोन, अपक्ष एक आणि शिवसेना १२ असे संख्याबळ होते. त्यामुळे १२ जणांमध्ये आमदार उदय सामंत या गटाचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आमदार गटाच्या मिताली भाटकर या सरपंचपदी निवडून आल्या होत्या; परंतु आठ महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे १२ सदस्य यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आत्ताची अधिकृत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आमदार सामंत यांच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. गावपॅनेलचे दोन ग्रामपंचायत सदस्य यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला आणि अविनाश काळे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये आजही शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये उर्फा फणसोपकर यांना शासकीय नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागी पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिवसेनेच्या रफिका तांडेल आणि ठाकरे सेनेच्या साबिया फणसोपकर या रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना असा सामना या पोटनिवडणुकीत रंगला होता. याबाबत शिवसेनेचे गोळप शिवसेना उपविभागप्रमुख बंधू वारीसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रभाग एकमध्ये पूर्वीपासून आमचे वर्चस्व असल्यामुळे व आमदार सामंत यांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केल्यामुळे या मोहल्ला प्रभागांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निश्चित निर्णय येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचे वर्चस्व अबाधित राहणार आहे
--------
दृष्टीक्षेपात
एकूण मतदान- १३१७
झालेले मतदान - ३८९
महिला- १७८
पुरुष- २११
टक्केवारी - २९.५३ टक्के