रत्ना संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्ना संक्षिप्त
रत्ना संक्षिप्त

रत्ना संक्षिप्त

sakal_logo
By

उद्या हिंदू एकता दिंडीचे आयोजन

रत्नागिरी,ता. १८ : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त ''हिंदु राष्ट्र - जागृती अभियान अंतर्गत रत्नागिरी येथे हिंदू एकता दिंडी आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (ता. 20) सायंकाळी 4 वाजता दिंडीला जयस्तंभ येथून सुरवात होईल. दिंडीची सांगता स्वातंत्र्यलक्ष्मी चौक येथे होणार आहे. दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषेत हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. भविष्यात भीषण आपत्काळाची पावले ओळखून हिंदूंची प्रभावी एकजूट दर्शविण्यासाठी सर्व संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना, उत्सव मंडळे, ज्ञाती संघटना यांनी आपापले बॅनर, वेशभूषा आणि चित्ररथांसह हिंदू एकता दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.