
ःराजापुरात पोटनिवडणुकीसाठी 61 टक्के मतदान
३१ (पान ३ साठी)
राजापूर पोटनिवडणुकीत ६१ टक्के मतदान
चार ग्रामपंचायती ; आज मतमोजणी
राजापूर, ता. १८ ः विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून त्यामधील तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील चार जागांसाठी आज मतदान झाले. नऊ उमेदवारांचे भवितव्य ठरवणाऱ्या या मतदानाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना सुमारे ६१ टक्के मतदान झाले. शुक्रवारी (ता. १९) मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागणार? याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या तालुक्यातील २० ग्रामपंचायतींमधील ३८ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी चार ग्रामपंचायतीमधील चार जागांसाठी प्रत्यक्षात निवडणूक होत असून त्यामध्ये नाटे येथील प्रभाग ४ मधील सर्वसाधारण स्त्री आरक्षण असलेली एक जागा, अणसुरे येथील प्रभाग ३ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेली एक जागा, दळे येथील प्रभाग १ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेली एक जागा, काजिर्डा येथील प्रभाग ३ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेली एक जागा यांचा समावेश आहे. या चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. या चार जागांसाठी आज मतदान झाले. या मतदानासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी होती. त्यातून, नाटे येथे ६१.३० टक्के, अणसुरे ६५.३७ टक्के, दळे ५५.४१ टक्के तर काजिर्डा ६१.९९ टक्के असे मिळून तालुक्यातील पोटनिवडणुकीचे सरासरी ६१.३६ टक्के मतदान झाले. त्यामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांनी जास्त मतदान केले आहे. या मतदानाची शुक्रवारी (ता. १९) मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.