अभिरूची-बहादूरशेख नाका पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम

अभिरूची-बहादूरशेख नाका पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम

३६ ( पान ३ साठी)

अभिरूची-बहादूरशेख नाका
पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम

जलवाहिनी स्थलांतर ; उर्वरित भागातील पाणीपुरवठा सुरळीत

चिपळूण, ता. १८ ः मुंबई-गोवा महामार्गलगत असलेली पालिकेची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ हॉटेल अभिरूची ते बहादूरशेख नाका या दरम्यानच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून गुरूवारी पाईपलाईनच्या मजबुतीसाठी काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे हे काम लांबणीवर पडले असून, महामार्गावरील पाच इमारतींचा पाणीपुरवठा बंद आहे; मात्र उर्वरित भागात पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.
चिपळूण शहरात चौपदरीकरणाअंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात सुरवातीपासून त्रासदायक ठरलेली महामार्गालगतची पालिकेची पाईपलाईन स्थलांतरचे काम सुरू आहे. गेले चार दिवस हे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्ग परिसरासह परशुराम नगर, बेबल कॉलनी, रॉयल नगर, विरेश्वर कॉलनी इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे; परंतु एका पाईपलाईनचे काम शिल्लक असून, गुरूवारी सकाळी ही पाईपलाईन जोडण्याचे काम केले; मात्र वळणावळणाची पाईपलाईन असल्याने त्याला काँक्रिटीकरणाद्वारे मजबुतीकरण केले जात आहे. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडले आहे. या कामामुळे महामार्ग परिसरात हॉटेल अभिरूची ते बहादूरशेख नाका या दरम्यानच्या पाच ते सहा इमारतींचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शुक्रवारी दुपारपासून या परिसरातही नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागेश पेठे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com