माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार
माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार

माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार

sakal_logo
By

kan181.jpg
03625
माधव कदम
-------------
माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार
कणकवली, ता. १८ः महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ''दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ''जीवन गौरव पुरस्कार'' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर केला आहे. पुढील वर्षी ६ जानेवारीला पोंभुर्ले येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे संचालक प्रा. राजेंद्र मुंबरकर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह कवी ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अलका बेडकीहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे उपस्थित होते. प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.