सुपर स्टार सर्कसला प्रतिसाद

सुपर स्टार सर्कसला प्रतिसाद

४१ (पान ५ साठी)

-rat१८p२९.jpg-
२३M०३६२३
रत्नागिरी ः रत्नागिरीत चंपक मैदानावर सुपरस्टार सर्कस सुरू आहे. त्यातील काही कसरती, झुल्यावरील खेळ.
-----------

सुपरस्टार सर्कसला रत्नागिरीकरांची पसंती

कलाकारांच्या कसरतीना दाद ; झुल्यावरच्या खेळांचे आकर्षण

रत्नागिरी, ता. १८ ः शहरातील उद्यमनगर, चंपक मैदान येथे सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कसला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कडक उन्हाळा असला तरीही सर्कस पाहायला रत्नागिरी शहर परिसर आणि तालुक्यातून अनेकजण येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळावर बंदी आली असल्याने फक्त कलाकारांच्या कसरती, झुल्यावरील खेळ, जोकरचे विनोद दाखवावे लागत आहेत. मुळचे सांगलीतील प्रकाश माने या मराठी माणसाने सुपरस्टार सर्कस टिकवून ठेवली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी सर्कस पाहण्यासाठी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रत्नागिरीत ५ मे पासून सर्कस सुरू झाली आहे. या सर्कसमध्ये ५० कलाकार आहेत. ते नेपाळ, आसाम, बंगाल आदी भागांतील आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बच्चे कंपनीला सुट्टी आहे. त्यामुळे अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सर्कस पाहण्यासाठी येत आहेत. सर्कस म्हटले की, अनेकांना वाघ, सिंह, हत्ती, कुत्रे, विविध प्रकारचे पक्षी, त्यांच्या करामती, रिंगमास्टर, क्रिकेट खेळणारा हत्ती, सायकल चालवणारा हत्ती आणि पेटत्या गोलातून उडी मारणारे वाघ, सिंह आठवतात; परंतु या सर्व खेळांवर सर्वोच्च न्यायालयाने बऱ्या वर्षांपासून बंदी आणली. त्यामुळे कलाकारांच्या खेळांवरच सर्कस सुरू आहे. भारतामध्ये काही मोजक्या सर्कस असून, त्यात मराठी माणसे कमी मालक-चालक आहेत; परंतु सांगलीतील प्रकाश माने यांनी जिद्दीने सुपरस्टार सर्कस टिकवून ठेवली आहे. त्यामुळे मराठी माणसासाठी ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे अनेक प्रेक्षकांनी सांगितले.
सुपरस्टार सर्कसमध्ये स्टंट, सायकलच्या कसरती, स्कायवॉक, जोकरच्या गमतीजमती, करमणूक म्हणून पाहायला मिळत आहे. सायंकाळी ४, ६.१५ आणि ८.३० असे ३ प्रयोग दररोज सुरू आहेत. एका वेळेस ८०० ते १ हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी बैठकव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com