धनगर समाजाने संघटित होण्याची गरज

धनगर समाजाने संघटित होण्याची गरज

swt1817.jpg
03624
कोरेगावः येथील कार्यक्रमात ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचा सत्कार करण्यात आला.

धनगर समाजाने संघटित होण्याची गरज
प्रवीण काकडेः सांगलीत धनगर समाज मेळावा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ः धनगर समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असून आजही धनगर समाज संघटित नसल्यामुळे धनगर समाजाचे विविध प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे धनगर समाज आजही अंधारात आहे. या समाजाला प्रकाशाकडे न्यायचे असेल तर धनगर समाजाने शिक्षण घेणे खूप काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. ते कोरेगाव (जि. सांगली) येथील काशिलिग बिरदेव जळपरडी सोहळा, धनगर समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संभाजीराव सिद, प्राध्यापक राम येडगे उपस्थित होते.
काकडे म्हणाले, ‘‘धनगर समाजाला खूप मोठा असा अलौकिक इतिहास असतानासुद्धा धनगर समाजाला विविध क्षेत्रातून हद्दपार करण्याचे काम राजकीय नेते मंडळी करीत आहेत. एसटी आरक्षणाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित असताना सुद्धा जाणून-बुजून या मागणीपासून लांब ठेवण्याचे षडयंत्र राजकीय नेते मंडळींनी केलेले आहे. तरी अशा राजकीय नेते मंडळीपासून धनगर समाजाने सावध राहिले पाहिजे. धनगर समाजाला लाचारी व गुलामगिरी जीवन न जगता स्वाभिमानाने जगलं पाहिजे. धनगर समाजाने अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेपासून लांब राहिले पाहिजे. धनगर समाजाचा मतासाठी वापर करून वापरा आणि फेका ही नीती वापरल्याने सर्वच राजकीय नेते राजकीय नेते व राजकीय पक्ष फक्त मतासाठी वापर करून धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचे काम गेली ७५ वर्षे झालं चालू असून तरी संघटित होऊन कोणताही पक्ष संघटना न बघता समाजाच्या मूलभूत प्रश्नासाठी एकसंघ होणे ही काळाची गरज असून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये धनगर समाजाने संघटित होऊन धनगर समाजाला शैक्षणिक चळवळीकडे नेण्याचे काम केले पाहिजे. तरच समाजाची प्रगती होईल. अन्यथा समाजाला दिवस चांगले येतील असे वाटत नाही. म्हणून समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने ग्राउंड लेव्हलला जाऊन समाजामध्ये काम करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ज्या जातीमध्ये ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला, त्या समाजासाठी काम करणे आवश्यक आहे.’’
यावेळी सागर गावडे, उमेश गावडे, राहुल गावडे, धनाजी गावडे, प्रशांत गावडे, महिपती गावडे, गुंडा गावडे, शिवाजी गावडे, दत्तात्रय गावडे, आप्पा गावडे, राम गावडे, नागनाथ गावडे, समीर गावडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com