सावंतवाडी मुख्याधिकारीपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती

सावंतवाडी मुख्याधिकारीपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती

swt1820.jpg
03636
सागर साळुंखे

सावंतवाडी मुख्याधिकारीपदी
सागर साळुंखे यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः येथील पालिकेच्या मुख्याधिकारीपदी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली जयंत जावडेकर यांना पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त केले आहे.
येथील पालिकेवर गेली दोन वर्ष प्रशासक आहे. या कालावधीत जावडेकर यांचा कारभार हा जनतेसाठी काहीसा खटकणारा राहीला होता. शहरात भाजपाच्या सत्ता काळात सुरु झालेली विकासकामे बंद होऊन ती अर्धवट स्थितीत राहिल्याने ते राजकीय विरोधकासाठी काहीसे वादग्रस्त ठरले होते. शिवाय शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वाढीवरुन विरोधकांनी त्यांना टार्गेट केले होते. खुद्द शालेय शिक्षण मंत्री यांनी मंत्रालय पातळीवर हालचाली करुन करवाढ रद्द केली होती. यावेळी मंत्री केसरकर यांनी आवश्यक असल्यास मुख्याधिकारी यांचीही चौकशी केली जाईल, असे सुतोवाच केले होते. अखेर आज त्यांची तडकाफडकी बदली केली असून अद्यापही बदलीचे ठिकाण त्यांना देण्यात आले नसून त्यांना पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जावडेकर यांनी आज सकाळी मुख्याधिरीपदाचा कार्यभार सोडल्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी साळुंखे यांनी आज दुपारी कार्यभार हाती घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com