उष्णतेची लाट;खबरदारीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उष्णतेची लाट;खबरदारीचे आवाहन
उष्णतेची लाट;खबरदारीचे आवाहन

उष्णतेची लाट;खबरदारीचे आवाहन

sakal_logo
By

उष्णतेची लाट; खबरदारीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यात वाढत असलेल्या तापमानाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाकडून दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
------------
बांदेकर महाविद्यालयास पुरस्कार
सावंतवाडीः मुंबईतील प्रतिथयश अस्मिता अकॅडमीतर्फे देण्यात येणारा एक्सेस २०२३ पुरस्कार यावर्षी बीएस बांदेकर कला महाविद्यालयातील अंतिम वर्ष बीएफएच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी ओंकार गुरव, पियुषा भालेराव आणि तन्वी चव्हाण यांनी पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. त्यांना वर्गशिक्षक तुकाराम मोरजकर, सिध्देश नेरुरकर व प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्था अध्यक्ष रमेश भाट यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
----