
गोव्यातील पर्यटकाकडून ओटवणेतील एकास मारहाण
गोव्यातील पर्यटकाकडून
ओटवणेतील एकास मारहाण
सावंतवाडीः किरकोळ अपघातावरुन झालेल्या बाचाबाचीतून गोव्यातील एका पर्यटकाने ओटवणे येथील एका मोटारचालकास मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. १०) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास येथील बाहेरचावाडा येथील पेट्रोल पंपानजिक घडली. त्यानुसार ओटवणे येथील मोटारचालक बाबाजी अनंत तारी (वय ५२, रा. तारीवाडी) यांनी येथील पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कीः तारी हे आपल्या मोटारीने मालवण ते ओटवणे असा प्रवास करीत होते. ते येथील बाहेरचावाडा येथील पेट्रोल पंपानजिक आले असता गोव्यातील ओमनी चालकाने त्यांच्या मोटारीला धडक दिली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बचावाची झाली. यावेळी ओमनी चालकाने तारी यांस उलट मारहाण केली व ते पसार झाले. तारी यांनी येथील पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली असुन पोलिस अधिक तपास पोलीस करीत आहेत.