आंबोली ग्रा.पं. पोटनिवडणूकीत 64.9 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली ग्रा.पं. पोटनिवडणूकीत 64.9 टक्के मतदान
आंबोली ग्रा.पं. पोटनिवडणूकीत 64.9 टक्के मतदान

आंबोली ग्रा.पं. पोटनिवडणूकीत 64.9 टक्के मतदान

sakal_logo
By

आंबोली पोटनिवडणूकीत
६४.९ टक्के मतदान
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १८ः येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत चुरशीने ६४.९ टक्के मतदान झाले. ७७२ पैकी ५०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात २५१ महिला तर २५० पुरुष मतदारांचा समावेश होता.
मतदानावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी केंद्रावर निवडणूक अधिकारी दीपक राऊळ, उदेश नाईक, बापूशेट कोरगावकर, हौसा गवस, मंडळ अधिकारी जी. आर. गुरव, तलाठी प्रवीण पोले, कोतवाल लाडू गावडे उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक यशवंते, पोलीस नाईक दीपक शिंदे, जयराम लोके, होमगार्ड ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील यांनी चोख व्यवस्थापन पाहिले. मतदान चुरशीने पण शांततेत पार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत बुधाजी उर्फ संतोष पाताडे, भाजप पुरस्कृत दीपक नाटलेकर, अपक्ष उमेदवार विलास गावडे हे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. दरम्यान, उद्या (ता. १९) १० वाजता तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.