Mon, Sept 25, 2023

अपघातप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा
अपघातप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा
Published on : 18 May 2023, 3:41 am
अपघातप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा
कुडाळः पिंगुळी-मोरजकरवाडी येथील अपघातप्रकरणी डंपर चालक रमेश भिवा परब (रा. परबवाडी गोवेरी) याच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात बुधवारी (ता. १७) दुपारी साडेबारा वाजता घडला होता. अपघाताची फिर्याद कारचालक मंदार शंकर पाटकर (वय ३० रा. वेताळ बांबर्डे आंगणेवाडी) यांनी येथील पोलीसात दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम करत आहेत.