क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

कुवे घाटात एसटी व मोटारीची धडक
सहा जखमी : दोन्ही वाहनांचे नुकसान

खेड, ता. १८ : दापोली मार्गावर आज सायंकाळी कुवे घाटाच्या पायथ्याशी मोटार व एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात मोटारीतील सहा जण जखमी झाले आहेत. खेड आगारातील एसटी बस ( एम एच १४ बीटी २७७) ही आज सायंकाळी खेडहुन दापोली निघाली होती. दापोली मार्गावरील कूवे घाटाच्या आरंभी समोरून येणाऱ्या मोटारी सोबत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एसटी बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. अपघातानंतर सुमारे एक तासापासून खेड दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात धडक बसल्यानंतर मोटार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उलटली आहे. त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
--

खेड बहिरवली मार्गावर अपघात


खेड, ता. १८ : तालुक्यातील खेड बहिरवली मार्गावर आज खारी नजीक प्रवासी रिक्षा व दुचाकी यांची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार व रिक्षा मधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
खेड भैरवली मार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खेड वरून बहिरवलीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा ची समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक सोबत धडक झाली. या अपघातानंतर रिक्षा रस्त्यावर उलटली. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या रिक्षेतून प्रवास करणाऱ्या दोन महिला, चालक व दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
--
भरणे येथे वाहनाच्या धडकेत युवक जखमी

खेड, ता. १८ : मुंबई - गोवा महामार्गावर भरणे नाका येथे पादचारी युवकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणाऱ्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम या संस्थेच्या रूग्णवाहिकेचे चालक सुरेश हंबीर यांनी अपघातस्थळी दाखल होत जखमी झालेल्या सौरभ दादाजी मोहिते (१८) या युवकास तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
--