बेकायदा गौण खनिज उत्खनन थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा गौण खनिज उत्खनन थांबवा
बेकायदा गौण खनिज उत्खनन थांबवा

बेकायदा गौण खनिज उत्खनन थांबवा

sakal_logo
By

swt191.jpg
03727
सावंतवाडीः येथील तहसीलदार अरुण मुंडे यांना निवेदन देताना आशिष सुभेदार, अनिल केसरकर व अन्य.

बेकायदा गौण खनिज उत्खनन थांबवा
मनसेची मागणीः सावंतवाडी तहसिलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः तळवणे, मळेवाड, कोंडूरा, धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा गौण खनिज उत्खनन सुरू असून येथील महसूल विभागाने त्या ठिकाणी पंचायती घालून संबंधितावर कारवाईचा बडगा उगारावा; अन्यथा कायदेशीर मार्गाने लढाई लढू, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन येथील तहसीलदार अरुण उंडे यांना सादर करण्यात आले.
येथील मनसेच्यावतीने देण्यात आलेल्या नियोजनामध्ये म्हटले आहे की, ''संबंधित चिरे खाणीसाठी एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्‍याच जागेत चिरे उत्खनन केले आहे. या दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु आहे. मुळात प्रत्यक्षात असलेल्या चिरे खाणीपैकी बरेच खाणी या बेकायदेशीर आहेत. याकडे महसूल विभागाने कानाडोळा केला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडला जात आहे. शिवाय उत्खननासाठी घालण्यात आलेल्या अटी, शर्थींचे पालन या खाण व्यावसायिकांकडून करण्यात येत नाही. याठिकाणी वायु व ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे. ५०० ब्रासच्या परवानगीवर १००० ब्रास उत्खनन होऊनही कोणीच याकडे लक्ष देत नाही. पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पाहणी करुन या कामाची पंचयादी घालावी; अन्यथा मनसेतर्फे कायदेशीर मार्गाने लढाई लढण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, मनविसे शहराध्यक्ष निलेश देसाई, मंदार नाईक, शुभम सावंत, मंदार नाईक, रोशन सावंत, प्रसन्न सावंत, कार्तिक माळकर, विशाल गुरव, सिद्धू मुलीमानि आदी उपस्थित होते.