पहिले भारतीय रँग्लर र. पु. परांजपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिले भारतीय रँग्लर र. पु. परांजपे
पहिले भारतीय रँग्लर र. पु. परांजपे

पहिले भारतीय रँग्लर र. पु. परांजपे

sakal_logo
By

१६ (टुडे पान ३ साठी, सदर)

१३ मे टुडे तीन

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो


-rat१९p४.jpg ः
२३M०३७१८
प्रकाश देशपांडे
-rat१९p२.jpg -
२३M०३७०९
र. पु. परांजपे
-----------

पहिले भारतीय रँग्लर र. पु. परांजपे

कोकणभूमीतील उत्कृट बुद्धिवैभवाचा आविष्कार म्हणजे रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे. १८९९ ला इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापिठात पदव्यत्तुर गणिताची परीक्षा झाली. या परीक्षेत र. पु. परांजपे आणि जॉर्ज वर्टव्हिसल एकसारखे गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. स्वाभाविकच दोघेही सीनियर रँग्लर या पदवीने सन्मानित झाले. यातला महत्वाचा भाग म्हणजे आजपर्यंत ही पदवी फक्त पाश्‍च्यात्यांनाच मिळत होती. परांजपे हे ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.
--

पाश्‍चात्यांच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देणारे रघुनाथ पु. परांजपे हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुर्डी या गावी १६ फेब्रुवारी १८७६ ला जन्मले. वडील पुरूषोत्तमपंत हे दशग्रंथी वैदिक होते. परांजपे यांचे प्राथमिक शिक्षण अंजर्ला, मुर्डी, दापोली या गावी झाले. पुढील शिक्षण कसे घ्यायचे याची चिंता होती. कारण, घरची परिस्थिती यथातथाच होती. परांजपे यांचे आतेभाऊ धोंडो केशव कर्वे यांनी परांजपे यांना शिक्षणासाठी मुंबर्इला आणले. परांजपे बीएससी परीक्षा झाले. सरकारने त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायला १८९२ ला शिष्यवृत्ती दिली आणि परांजपे इंग्लंडला जाऊन पहिले भारतीय रँग्लर झाले. १९०२ ला परांजपे भारतात आले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दाखल झाले. राष्ट्रीय भावनेच्या उदात्त विचाराने सुरू झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे हे महाविद्यालय. डेक्कन एज्युकेशन संस्था स्थापन करणारे लोकमान्य टिळक, आगरकर इ. या सर्वांनी संस्थेकडून किमान मानधन स्वीकारून हे महाविद्यालय चालवले होते. रँग्लर परांजपे प्राचार्य पदावर नियुक्त झाले तेव्हा त्याना ७५ रु. मानधन दिले जात होते. चालकांची अट होती संस्थाचालकांनी, डेक्कनच्या सभासदांनी अन्य कुठे अर्थार्जन करू नये अशी. या विषयावरून मतभेद होऊन लोकमान्यांनी डेक्कन एज्युकेशनचा राजीनामा १८९० ला दिला. १९०२ ते १९२७ पर्यंत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषवले. रँग्लर परांजपे हे त्या काळच्या राजकीय विचारधारेत मवाळ गटाचे नेते होते. इंग्रजांच्या न्यायवुद्धीवर त्यांचा विश्‍वास होता. त्यामुळे परांजपे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले नाहीत.
परांजपे प्राचार्यपदावर असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परदेशी कापडाची जंगी होळी केली. स्वातंत्र्यवीर तेव्हा महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहात होते. देशप्रेमाचे बाळकडू प्यायलेले. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जहाल आंदोलनाचा पुरस्कार केला होता. कापडाची होळी ७ ऑक्टोबर १९०५ ला झाली. त्या दिवशी विजया दशमीचा सण होता. स्वातंत्र्यासाठी जणू काही तरुणांनी सीमोल्लंघनच केलं. प्राचार्य परांजपे या अशा आंदोलनाच्या विरुद्ध होते. प्राचार्यांनी सावरकरांवर कठोर कारवार्इ म्हणून १० रु. दंड आणि वसतिगृह सोडण्याची कारवार्इ केली. रँग्लर परांजपे रँग्लर पदवी घेऊन जेव्हा भारतात आले तेव्हा लोकमान्यांनी त्यांचे अभिनंदन करणारा अग्रलेख लिहिला होता'' परंतु पुढे सगळा नूर बदलला. विदेशी कापडाची होळी झाली तेव्हा लोकमान्यांनी उपस्थितांसमोर जहाल भाषण केले. जेव्हा प्राचार्य परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढले त्या वेळी एकेकाळी अभिनंदनाचा लेख लिहिणाऱ्या लोकमान्यांनी ‘हे आमचे गुरू नव्हेत’, असा झणझणीत अग्रलेख लिहून परांजप्यांचा निषेध केला होता. १९१३ ला परांजपे मुंबर्इ विश्‍वविद्यालयातर्फे कायदेमंडळावर निवडून गेले. ही नियुक्ती करून त्यांना शिक्षणमंत्रिपदही दिले. १९२७ ला इंग्रजी सरकारने भारतमंत्र्यांच्या इंडिया कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. परांजपे शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन इंग्लंडला गेले. लंडन येथे आठ वर्षे वास्तव्य केल्यानंतर १९३५ ला भारतात परत आले आणि पुन्हा त्यांनी फर्ग्युसनचे प्राचार्यपद स्वीकारले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुणे विद्यापिठाचे कुलगुरू झाले. १९४४ ला इंग्रज सरकारने भारताचे हाय कमिशनर म्हणून ऑस्ट्रेलियाला पाठवले. पुढे लखनौ विद्यापिठावरही त्यांनी कुलगुरू म्हणून काम केले. केवळ महिलांसाठी असलेल्या आणि धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या श्रीमती नथीबार्इ दामोदर ठाकरसी विद्यापिठाला त्यांनी सहकार्य केले आणि या विद्यापिठाचेही कुलगुरूपद स्वीकारले. लोकमान्य जहाल गटाचे नेते होते. परांजपे मवाळ गटाचे. लोकमान्य इंग्लंडहून परत आले. पुणे शहराने लोकमान्यांचा नागरी सत्कार करायचे ठरवले. या सत्काराला परांजपे आणि केशवराव जेधे यांनी विरोध केला. या विरोधकांना न जुमानता मोठा नागरी सत्कार आणि मानपत्र देऊन प्रचंड संख्येने पुणेकर जनतेच्या उपस्थितीत सत्कार झाला. सत्काराला विरोध करणाऱ्यांसाठी सभेच्या जागी आवर्जून खुर्च्या मांडल्या होत्या; मात्र रँग्लर परांजपे आणि जेधे इ. मंडळी उपस्थित राहिली नव्हती. १९१६ ला लखनौला काँग्रेसचे अ. भा. अधिवेशन झाले त्याला रँग्लर परांजपे उपस्थित होते. न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेमस्त राजकारणाचे रँग्लर परांजपे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच प्रागतिक पक्षाच्या लिबरल फेडरेशनचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. देशातील नेमस्त आणि उदारमतवादी गटाचे नेते म्हणून त्यांची प्रसिद्धी होती.
स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जसे कर्वे यांना सहकार्य केले तसेच पुण्यातील हुजुरपागा या मुलींच्या शाळेत प्राथमिक विभाग सुरू करण्यासाठी १८८५ ला ५ हजार रुपयांची देणगी दिली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र रघुनाथराव कर्वे यांच्या कुटुंब नियोजन कार्याला रँग्लर परांजपे यांनी पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांनी रघुनाथरावांच्या समाजस्वास्थ्य मासिकात लेख लिहिले आणि स्त्रियांसाठी दवाखाना सुरू केला होता. रँग्लर परांजपे यांची नात सर्इ परांजपे यांनी परांजपे हे मराठी भाषेचे अभिमानी कसे होते हे सांगताना ऑस्ट्रेलियात असताना बाहेर इंग्रजीच बोलायला लागायचे; मात्र घरी मराठीतच बोलण्याचा कटाक्ष असायचा. घरी बोलताना जर एखादा इंग्रजी शब्द चुकून तोंडातून गेला तर रँग्लर एक रुपया दंड करायचे, अशी आठवण लिहिली आहे. ते नास्तिक होते. त्यामुळे घरी देव आणि देव्हारा नसायचा; पण संध्याकाळ झाली की, अनेक संस्कृत स्तोत्रं म्हणायला लागायचे कारण, त्यामुळे आपल्या जिभेला वळण लागते, असेही त्यांनी सांगितले. रँगलर परांजपे यांना दीर्घायुष्य लाभले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी आपले ‘एटीफोर नॉट आऊट’ हे आत्मचरित्र लिहिले. ९० व्या वर्षी ६ मे १९६६ ला त्यांचे निधन झाले.


(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)