
कोकण रेल्वेच्या गाड्या फलाट एकवरच थांबवा
२४ (पान २ साठी)
-ratchl१८१.jpg ः
२३M०३५२०
चिपळूण ः रेल्वे स्थानकाची पाहणी करताना शौकत मुकादम व सहकारी.
----------
रेल्वेच्या गाड्या फलाट एकवर थांबवा
शौकत मुकादम ; कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय दूर करावी
चिपळूण, ता. १८ ः चिपळूण रेल्वेस्टेशनवर सध्या सर्व गाड्या फलाट दोनवर वर थांबवण्यात येतात. गाडी सुटली की, सर्व प्रवासी आपले साहित्य, लहान मुले, महिलांना घेऊन अंडरपासने फलाट एक वर न जाता ते पटरी ओलांडून पलिकडे जाणे अधिक पसंत करतात. दिव्यांग व इतर व्यक्तीही पटरीवरूनच जातात. हे सर्व गैरसोयीचे असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने केलेला बदल तत्काळ रद्द करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
चिपळूण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. एकच्या बाजूलाच महामार्ग आहे. याच बाजूला रिक्षा, खासगी गाड्या किंवा एसटीच्या गाड्या उभ्या असतात. यासाठी प्रवाशांना कसरत करून प्रसंगी जीवावर उदार होऊन फलाट क्र. दोनवरून फलाट क्र. १ वर जावे लागते. प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेता कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत थेट रेल्वेस्थानक गाठले आणि या संदर्भात विचारणा केली; परंतु उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचे नाव पुढे करत असमर्थता दाखवली. त्यामुळे मुकादम चांगलेच संतापले. आम्हाला तुमची कोणतीही कारणे नकोत. प्रवाशांना अशाप्रकारे त्रास देणार असाल तर सहन करणार नाही. पुढील एक महिन्यात तुमची सर्व कामे पूर्ण करून परिस्थिती पूर्वपदावर आणा. मुंबईतून येणाऱ्या व लांब पल्ल्याच्या रेल्वे एक नंबर प्लॅटफार्मवरच थांबल्या पाहिजेत, अन्यथा रेल्वेसाठी घेण्यात येणारे आमच्या वाशिष्ठीतील पाणी बंद करू, असा इशाराच मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.
या वेळी वालोपेचे माजी सरपंच रवींद्र तांबीटकर, कळंबस्तेचे माजी सरपंच चंद्रकांत सावंत यांनीही कोकण रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले. प्रवाशांची गैरसोय दूर झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी कळंबस्तेचे उपसरपंच गजानन महाडिक, विकास जोर्वेकर, बशीरभाई चिकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.