आशा व गटप्रवर्तकांचे मानधन एकत्रित दरमहा देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा व गटप्रवर्तकांचे मानधन एकत्रित दरमहा देऊ
आशा व गटप्रवर्तकांचे मानधन एकत्रित दरमहा देऊ

आशा व गटप्रवर्तकांचे मानधन एकत्रित दरमहा देऊ

sakal_logo
By

१८ (टुडे ३ साठी, मेन)

आशा, गटप्रवर्तकांचे मानधन दरमहा देणार

सहसंचालक बोरकर यांचे आश्वासन ः आशा गटप्रवर्तक संघटनेशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः आशा व गटप्रवर्तक महिलांचे सर्व प्रकारचे मानधन मोबदला एकत्रित दरमहा देण्याबाबत महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक सुभाष बोरकर यांनी आशा गटप्रवर्तक संघटनेला आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ मे रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक बोरकर यांना त्यांच्या मुंबई कार्यालयामध्ये शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी विविध मागण्यांच्या संदर्भात सखोल चर्चा झाली. गटप्रवर्तक महिलांच्या मानधनाचे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे सुसूत्रीकरण करुन वेतनश्रेणी देण्यात यावी. याबाबतचा प्रस्ताव PIP राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात आली. याबाबतही त्यांनी सविस्तर मागण्यांचे टिपण द्यावे असे सांगितले. बैठकीमध्ये गटप्रवर्तक महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी साठी बसणे, मेडिसिन देणे व इतर करारपत्रांमध्ये नसलेली कामे सांगण्याचा प्रयत्न करता कामा नये अशी मागणी करण्यात आली. याबाबतही सर्व महाराष्ट्रभर लेखी आदेश पाठवण्यात येतील असे आश्वासन सहसंचालक यांनी दिले. त्यावेळेस महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांचे काम पाहणाऱ्या डॉक्टर पूजा पाटील उपस्थित होत्या. चर्चेमध्ये डॉक्टर पूजा पाटील यांनी स्पष्ट केले की संपूर्ण राज्यामध्ये सर्वच ठिकाणी सीएचओ भरण्याचे काम पूर्ण होत आलेले आहे. शहरांमध्ये मात्र अजून ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याचेही लवकर त्याबाबती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की आशा व गटप्रवर्तक महिलांना नेमून दिलेल्या कामा व्यतिरिक्त कोणतेही काम सांगता कामा नये. याबाबतही स्पष्ट आदेश करावेत असे सांगण्यात आले हे सुद्धा सह संचालक यांनी मान्य केले. सर्व मागण्यांच्या संदर्भात दिल्ली राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत आलेल्या आदेशांचे अवलोकन करून याबाबत आवश्यक सूचना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कळविण्यात येतील असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळामध्ये आयटक संघटनेचे शंकर पुजारी, विद्या कांबळे, इंदुमती येलमर, शुभांगी मोरे, काविता माने, शामल गायकवाड व अश्विनी वाघमारे इत्यादी आशा गटप्रवर्तक महिलांचा समावेश होता.
------

आशासेविकांच्या मागण्या

पीएमएमव्हीवायचे अर्ज आशांना भरावे लागतात, ते रद्द करावे. गोल्डन कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये, आभा कार्ड काढण्यासाठी सक्ती केली जाते व कार्ड काढावे लागते ते रद्द करावे, एनसीडी फॉर्म ऑनलाइन आशाने भरावे हे रद्द करण्यात यावे, ई संजीवनी कॉल लागत नाहीत, त्यामुळे एक तास कॉल चालू ठेवावा लागतो. त्यामुळे कॉलसाठी त्रास होतो ते थांबवावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने गटप्रवर्तक इंदुताई यलमर व आशा विद्या कांबळे यांनी केली.