मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम
मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम

मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम

sakal_logo
By

swt197.jpg
03767
मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर

मृणाल सावंत, मंत्रा कोळंबकर
एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः उत्तरवाडा विकास मंडळ, तांबळडेग (ता.देवगड) यांच्या वतीने आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत (पिंगुळी-कुडाळ) तर लहान गटात मंत्रा कोळंबकर (देवगड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तांबळडेग उत्तरवाडा विकास मंडळाच्यावतीने श्री देव महापुरुष मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा निकाल असाः मोठा गट प्रथम - मृणाल सावंत (पिंगुळी-कुडाळ), द्वितीयः नेहा जाधव (इन्सुली-सावंतवाडी),  तृतीय विभागून : ऋत्विक निकम (रत्नागिरी) आणि समर्थ गवंडी (रेडी-वेंगुर्ले), उत्तेजनार्थः दर्शन पाटील (मालवण), जैताश्री मालाडकर (मुंबई), तन्मय आईर (कुडाळ-पिंगुळी), शंकर गवस (दोडामार्ग), प्रेयश पवार (कणकवली).
लहान गटः प्रथम-मंत्रा कोळंबकर, द्वितीय-अभंग रचित, तृतीय विभागून : निधी खडपकर आणि रेवा जोशी, उतेजनार्थ पवित्रा उपरकर, कार्तिकी मेस्त्री, आरव आईर, सरगम कोयंडे, श्रुष्टी पवार, अँमी डिसोझा, समृद्धी कदम, विवेक सावंत. सर्व विजेत्यांना अनुक्रमे बक्षिसे, सहभागींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत ४५ स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षण आज्ञा कोयंडे, मनस्वी कुबल, चंद्रशेखर वेंगुर्लेकर यांनी केले. निवेदन दर्शना कांदळगावकर यांनी केले. यावेळी रमाकांत सनये, प्रमोद कांदळगावकर, उदयनाथ कोयंडे, सुभान कोळंबकर, नितीन कोळंबकर, निलेश प्रभू, दिप्तेश कोयंडे उपस्थित होते.