भक्ती खामकरला मानांकन

भक्ती खामकरला मानांकन

११ (टूडे १ साठी, संक्षिप्त)

-rat१९p१४.jpg
२३M०३७२९
ःभक्ती खामकर
---
शिवछत्रपती पुरस्कारासाठी भक्ती खामकरला मानांकन

लांजा ः तालुक्यातील विलवडे गावची सुकन्या भक्ती खामकर हिचे नेमबाजी क्रीडाप्रकारात अतुलनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनच्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी मानांकन झाले आहे. राज्य निवड समितीने ही नामांकने जाहीर केली आहेत. लांजातील विलवडे येथील भक्ती हिने लांजाचे नाव रोशन केले आहे. भक्तीचे वडील भास्कर खामकर हे विलवडे गावी असून त्यांनी आनंद व्यक्त केला. भक्ती सध्या कोपरगाव डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. नेमबाजी स्पर्धेत तिने आतापर्यंत ४ पदके प्राप्त केली आहेत. मूळ गाव विलवडे येथे भक्ती आई-वडिलांबरोबर आल्यावर नेमबाजीचा सराव करत असे. तिच्या या यशात आई-बाबा आणि क्रीडाशिक्षक, अधिकारी यांचे मोठे योगदान आहे. तिचे शिक्षण हे मुंबई येथे सुरू आहे. राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नेमबाजीत आपले कौशल्य नैपुण्य दाखवले आहे. तिची आई मुंबई पोलिसदलात असून, ती भक्तीची खरी प्रेरणा आहे. नामांकनासाठी निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---

ग्राहकांसाठी ग्रीन नेटद्वारे सावलीचा आधार

खेड ः खेड बाजारपेठेत येणाऱ्‍या ग्राहकांना उष्म्याची झळ पोहोचू नये यासाठी खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर ग्रीन नेट बांधल्याने ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. उन्हाचा तडाखा इतका आहे की, दुपारच्या सुमारास एसटी स्टॅण्डसह बाजारपेठेतदेखील तुरळक गर्दी दिसून येते; परंतु बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी ग्राहकांना व पादचाऱ्‍यांना त्रासदायक होत असतानाच दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ यामुळे ग्राहकांची डोकेदुखी आणखीनच वाढत आहे. बाजारपेठेत येणाऱ्‍या ग्राहकांना निदान उन्हाच्या कमी झळा बसाव्यात यासाठी व्यापाऱ्‍यांनी ही नवी शक्कल काढली असून, आपल्या दुकानासमोर ग्रीन नेट लावले आहेत. उष्मा कमी करण्यासाठी दुकानदारांनी लढवलेली ही शक्कल खेड बाजारपेठ येणाऱ्‍या ग्राहकांच्या व्यापाऱ्‍यांच्या देखील फायद्याची आहे. त्यामुळे बसस्थानकापासून वाणीपेठ, सुपरमार्केट, निवाचा चौक यासह बाजारपेठेत इतरत्र ग्रीन नेटने दुकानाच्या समोरचा भाग आच्छादलेला दिसून येत आहे.
--
पोस्ट विभागाची १५ जूनला पेन्शन अदालत

रत्नागिरी ः अधीक्षक डाकघर कार्यालयातर्फे १५ जूनला सकाळी ११ वा. विभागीय डाक कार्यालयात जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी सर्व तपशिलासह केलेला असावा. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात् उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटारा झालेले नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. संबंधितांनी अर्ज एन. टी. कुरळपकर, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे ९ जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com