सिंधुदुर्गात 23 पासून स्त्री शक्ती समाधान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात 23 पासून स्त्री शक्ती समाधान शिबीर
सिंधुदुर्गात 23 पासून स्त्री शक्ती समाधान शिबीर

सिंधुदुर्गात 23 पासून स्त्री शक्ती समाधान शिबीर

sakal_logo
By

समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे
निवारण करण्यासाठी शिबीर
२३ पासून आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः शासन आपल्या दारी अभियानातंर्गंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर २३ ते २६ मे या कालावधीत प्रत्येक तालुक्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर’ आयोजित केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर यांनी दिली आहे.
या शिबीरात जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय विभाग सहभागी होणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या शिबीरांचा मुख्य उद्देश आहे. २३ ला छत्रपती शिवाजी चौकाजवळ, मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली, तहसीलदार कार्यालय, कुडाळ व वेंगुर्ले. २४ ला वैभववाडी तहसीलदार कार्यालय, २५ ला देवगड व दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे होणार आहेत. २६ ला समर्थ हॉल कोळंब, मालवण व आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे शिबीरांचे आयोजन केले आहे.
शिबीराच्या ठिकाणी तात्काळ तक्रार निवारण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा उपस्थित महिलांना पुरविण्यात येणार असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन काटकर यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने मुलींना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला व बालविकास विभागामार्फत महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्यात येतो.