पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्‍यांना दिलासा द्या

पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्‍यांना दिलासा द्या

२७ (पान २ साठी)

पर्ससीन नेट मच्छिमाऱ्यांना दिलासा द्या

केंद्रीय मंत्र्यांना निवेदन; पर्ससीन नेट मच्छीमार असोसिएशनची मागणी

रत्नागिरी, ता. १९ ः मिरकरवाडा बंदरावर मच्छीमारांना अधिकच्या सुविधा देण्यासह पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांवरील बंधने उठवावीत, अशी मागणी केंद्रीय मंत्री परूषोत्तम रूपाला यांच्याकडे निवेदनाद्वारे पर्ससीन नेट मच्छीमार रत्नागिरी तालुका मालक असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
महामत्स्य अभियानांतर्गत मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि अन्य यांच्या हितासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री परूषोत्तम रूपाला यांना पर्ससीन नेट मच्छीमार रत्नागिरी तालुका मालक असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. विविध मत्स्यपालन योजना आणि कार्यक्रम मत्स्यमारांसाठी लागू करून आमच्या चिंता दूर कराव्यात, आमच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने मच्छीमारांना मुलभूत अधिकार देण्यास सांगितले आहे. मागील काही वर्षात पर्ससीन नेटद्वारे मासेमारी पकडण्यास घातलेली बंदी केंद्र उठवली पाहिजे. जो मोसम मासे पकडण्यासाठी चांगला आहे त्याचवेळी बंधने घाततेली आहेत. विशेषज्ञ समितीशी चर्चा न करता महाराष्ट्र सरकारने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पर्ससीन नेटद्वारे मासे पकडण्यावर बंदी घातली. या व्यवसायावर कोकणातील १० हजारापेक्षा जादा कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही प्रभावित होत आहे. मच्छीमारांच्या हितासाठी सरकार योजना बनवत असताना या लोकांचा विचार झाला पाहिजे. पर्ससीन नेटद्वारे विशेष आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक समुद्री क्षेत्राच्या बाहेर मासे पकडण्यासाठी अनुमती देण्यास हरकत नाही. महाराष्ट्र सरकारने ही बंदी काढावी त्यासाठी आवश्यक निर्देश दिले जावेत. प्रादेशिक समुद्री जलक्षेत्राच्या बाहेर भारत सरकारच्या क्षेत्रात १२ नॉटिकल माईल्सपासून २०० नॉटिकल माईल्सपर्यंत मासे पकडण्यास परवानगी मिळावी. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मिरकरवाडा जेटी आणि ससून डॉक ही दोन्ही बंदरे मोठी आहेत. या ठिकाणी मासे उतरवण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. मिरकरवाडा बंदरांचा विकास होणे आवश्यक आहे. समुद्री कृषी, मत्स्यपालन आणि केज कल्चर हे राबवणे गरजेचे आहे, अशी मागणी निवेनाद्वारे करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com