जिंकण्याची इर्षा खेळांडूमध्ये असलीच पाहिजे

जिंकण्याची इर्षा खेळांडूमध्ये असलीच पाहिजे

३१ (पान २ साठी)


- rat१९p३१.jpg- र
23M03818
रत्नागिरी ः कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह प्रमोद शेरे, प्रशांत साळूंखे, प्रसाद सावंत.
--------
जिंकण्याची इर्षा खेळांडूच्यात हवी

भास्कर जाधव ; जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. १९ ः कबङी हा मातीतील मर्दानी खेळ आहे. येथे जिंकण्याच्या जिद्दीनेच उतरावे लागते. जिंकण्याची जी इर्षा लागते ती खेळांडूमध्ये असणे आवश्यक आहे. कबड्डीमध्ये जसं तंगडी ओढून चितपट करायचे असते तसेच राज्यात उलथापालथ झाल्यानंतर मराठीवर, शिवसेनेवर प्रेम असलेल्या रत्नागिरीतील जनतेला कोणाची तंगडी पकडून चितपट करायचे आहे, हे माहित आहे असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांना लगावला.
रत्नागिरी युवासेनेच्यावतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आठवडा बाजार येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळूंखे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, दुर्गेश साळवी, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
या वेळी शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत कोकणातून नाव असलेल्या आरती कांबळे, अपेक्षा सुतार यांचा युवासेनेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार जाधव म्हणाले, कबड्डीमध्ये हारजीत असते; मात्र खेळाची व जिंकण्याची जिद्द सर्वात महत्वाची आहे. खेळांडूनी खिलाडूवृत्तीने खेळाकडे पाहिले पाहिजे. आता आपल्याला लाढाईच करायची आहे. यापुढील प्रत्येक लढाईला सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com