Thur, Sept 21, 2023

नील बांदेकरचे विविध स्पर्धात यश
नील बांदेकरचे विविध स्पर्धात यश
Published on : 19 May 2023, 12:14 pm
swt198.jpg
03799
नील बांदेकर
नील बांदेकरचे विविध स्पर्धात यश
बांदा, ता. १९ः छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बांदा येथे श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर डॉट कॉम असोसिएशन आयोजित ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत तो संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला. ऑफलाईन स्पर्धा परीक्षेत सहाव्या क्रमांकामध्ये येऊन त्याने मेरिट लिस्टमध्ये स्थान प्राप्त केले आहे. अभ्यासाबरोबरच इतर कलेमध्येही नीलने आपली चमक दाखवून दिली आहे. त्याच्या या यशात केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक त्याचबरोबर शाळा समिती यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.